Corona-Test 
पिंपरी-चिंचवड

अरे देवा! नवऱ्यापाठोपाठ बायकोचाही अहवाल आला पॉझिटिव्ह

सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ - तळेगाव स्टेशन विभागात मंगळवारी आढळलेल्या ५० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुषाच्या पत्नीचा अहवालही बुधवारी पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली. त्यामुळे  तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ६६ वर पोचली आहे. त्यात ३१ जण सक्रिय आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तळेगाव स्टेशन विभागात राहणारा व चिंचवड येथील एका गॅस एजन्सीत काम करणाऱ्या ५० वर्षीय पुरुषाचा कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याच्या पत्नीचा स्वॅब घेण्यात आला होता. ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. तिच्यावर तळेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.

दरम्यान, मावळ तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६६ वर पोचली असून त्यात शहरी भागातील २३ व ग्रामीण भागातील ४३ रुग्णांचा समावेश आहे. त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला असून ३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३१ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panvel: पनवेलमधील व्हायरल व्हिडिओचे सत्य समोर; अंगणवाडी सेविकेने नव्हे तर आईनेच मुलीला मारहाण केल्याचे स्पष्ट

Latest Marathi News Live Update : राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी आज 'यलो अलर्ट'; अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता

Jain Community : मालाडमधील 'त्या' वादग्रस्त प्रकरणावर अखेर पडदा! जैन समाजाचे शिष्टमंडळ 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंना सुपूर्द केला लेखी माफीनामा

Maharashtra Rain Update: एक दिवस हजेरी लावून विश्रांती... पुण्यातील पाऊस कुठं हरवला, राज्यात काय परिस्थिती?

Pune: रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; सहा फलाटांच्या कामाला सुरुवात ; नवीन ६० गाड्या धावणार

SCROLL FOR NEXT