IT Company
IT Company Sakal
पिंपरी-चिंचवड

आयटीयन्सना पुन्हा ‘अच्छे दिन’; मेगाभरती सुरू

सकाळ वृत्तसेवा

डिजिटलायझेनशच्या जमान्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध पदांसाठीची मागणी शंभर पटींनी वाढली आहे.

पिंपरी - डिजिटलायझेनशच्या जमान्यात माहिती तंत्रज्ञान (Information Technology) क्षेत्रातील विविध पदांसाठीची मागणी शंभर पटींनी वाढली आहे. त्यामुळे, आयटीयन्सना (Itians) दोन वर्षांच्या कोरोनातील कठीण कालावधीनंतर ‘अच्छे दिन’ (Acche Din) आले आहेत. सध्या पिंपरी-चिंचवड शहरासह पुण्यातील बड्या आयटी कंपन्यांमध्ये हजारोंच्या पटीत विविध पदांची मेगाभरती (Mega Recruitment) सुरू आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रामधील फ्रेशर्स, तसेच अनुभवी व विविध कौशल्य अवगत असलेल्या ‘आयटीयन्स’ना प्रचंड मागणी वाढल्याचे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांतील अनुभवी तज्ज्ञांनी सांगितले.

बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात आहेत. चार ते पाच लाख आयटी नोकरदार या शहरात आहेत. तसेच, सुमारे पाच हजार बड्या कंपन्यांसह लहान कंपन्यांमध्ये विविध प्रकल्पांवर काम करणाऱ्या कंपन्या आहेत. त्यामुळे, सर्वाधिक युवा वर्ग माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राकडे आकर्षित झाला आहे. कोरोना काळात कंपन्यांनी १० ते २५ लाख वार्षिक पॅकेज असणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कमी केले. मात्र, जानेवारी २०२२ पासून परिस्थिती पूर्वपदावर आली असून मोठी नोकरभरती सुरु आहे. या कंपन्यांनी स्वत:च्या वेबसाइटवर तसेच प्रसिद्धीमाध्यमे व सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. सध्या युवकांना विविध पदांच्या ऑफर्स मिळत आहेत.

आर्थिक वर्ष २०२२ मध्ये, टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, कॉग्निझंट, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, एक्सेंचर, कॅपजेमिनी या आयटी बड्या प्रमुख कंपन्यांनी आधी २.३ लाख नवीन पदवीधर पदांची भरती केली आहे. ही सर्वांत विक्रमी संख्या आहे. यासह, फ्रेशर्सच्या सरासरी पगारातही संपूर्ण कॅंम्पसमध्ये वाढ झाली आहे. यासह, मोठ्या कंपन्यांनी आर्थिक २०२३ या वर्षामध्ये नवीन भरती कार्यक्रमाचा आणखी विस्तार करण्याची योजना केली आहे. टीसीएस या बड्या कंपनीत गेल्या महिन्यात कमाई या कॉलममध्ये सांगितले आहे की, कंपनीने या आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांत सुमारे ७७ हजार फ्रेशर्सना कामांवर घेतले आहे. कंपनीने चौथ्या तिमाहीत जानेवारी-मार्च २०२२ मध्ये आणखी काही आयटी पदे भरणार असल्याची योजना आखली आहे.

कॉग्निझंटने या वर्षी ५० हजार पदे भरण्याची योजना आखली आहे. तसेच, विप्रो कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत २०२२ मध्ये कॅम्पसमधून ७० टक्के अधिक पदांची भरती करणार असल्याचे सांगितले आहे. एका खासगी कंपनीने केलेल्या अहवालानुसार २०२२ च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस आयटी कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवणाऱ्या फ्रेशर्सची संख्या सुमारे साडेतीन लाखांच्या पुढे असेल, असा अनुमान वर्तवला आहे.

या भाषांमध्ये नोकऱ्या

जावा, पायथॉन, नेटवर्क इंजिनिअरिंग, मशिन लर्निंग, डेटा सायन्स यासह इआरपी, सॅप आदी.

या पदांची मागणी सर्वाधिक

फ्रेर्शर्ससाठी ज्युनिअर डेव्हलपर, ट्रेनी डेव्हलपर, असोसिएट डेव्हलपर, कन्सल्टंट व अनुभवी पदांसाठी सिनिअर टेक्निकल कन्सल्टंट, कन्सल्टंट, सिनिअर टेक्निकल कन्सल्टंट तसेच कंपनीच्या गरजेनुसार विविध पदे , ही मागणी यूएसए, यूके, जर्मन या देशांमधून विविध प्रकल्पांसाठी सर्वाधिक सुरू आहे.

वार्षिक पगाराचे पॅकेज

  • १० ते २५ लाख अनुभवी

  • ३.५ ते ५ लाख फ्रेशर्स

मी कोरोनाकाळात नोकरी करताना ३.५ लाखांचे पॅकेज होते. कामाचा प्रचंड व्याप होता. सध्या एका कंपनीची चांगली ऑफर मिळाली असून पॅकेज १२ लाख झाले आहे. मित्रांच्या पॅकेजमध्ये १०० टक्क्यांवर वाढ झाली आहे. काहींना २० ते २५ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. कोरोनानंतर डिजिटलायझेनशनची डीमांड वाढल्याने नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत.

- नीलेश चवानके, आयटी अभियंता, हिंजवडी

कंपन्यांमध्ये गरजेप्रमाणे मोठ्या प्रमाणात भरती सुरू आहे. वर्क फ्रॉम होम ९० टक्के अद्यापही आहे. एप्रिल महिन्यापासून अधिक प्रमाणात नोकरभरतीची मागणी वाढणार आहे.

- चरणजीत भोगल, मुख्य कार्यकारी अधिकारी, एचआयए

बदलत्या ट्रेंडसह, सॉफ्ट स्किल्सकडेही तांत्रिक कौशल्यांइतकेच लक्ष दिले जात आहे. जेव्हा फ्रेशर्सचा विचार केला जातो तेव्हा कंपन्या विश्लेषणात्मक विचार, संवाद कौशल्ये, भावनिक बुद्धिमत्ता आणि सकारात्मक वृत्ती असलेल्या उमेदवारांच्या शोधात आहेत.

- सचिन इंगळे, मेकॅनिकल अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT