आरटीई प्रवेशासाठी पुणे जिल्ह्याला मिळाले कमी दिवस

आरटीईची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यात १६ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली. मात्र पुणे जिल्ह्यात तांत्रिक अडचणीमुळे ही प्रवेश प्रक्रिया प्रत्यक्षात २३ फेब्रुवारीपासून सुरू झाली.
RTE
RTEsakal
Summary

आरटीईची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यात १६ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली. मात्र पुणे जिल्ह्यात तांत्रिक अडचणीमुळे ही प्रवेश प्रक्रिया प्रत्यक्षात २३ फेब्रुवारीपासून सुरू झाली.

भोसरी - मुलांच्या मोफत शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) (RTE) खासगी शाळेतील (School) २५ टक्के विद्यार्थ्यांच्या प्रवेशासठी (Admission) ऑनलाईन अर्ज (Online Form) भरण्याची मुदत १० मार्चला संपली. राज्यात ही प्रवेश प्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. मात्र पुणे जिल्ह्यात तांत्रिक अडचणीमुळे ही प्रवेश प्रक्रीया २३ फेब्रुवारीपासून सुरू झाली. इतर जिल्ह्यातील पालकांना आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेसाठी २३ दिवस मिळाले तर पुणे जिल्ह्यातील पालकांसाठी फक्त १४ दिवसच मिळाले. त्यामुळे काही पालकांना प्रवेश अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची मागणी पालकांमधून होत आहे.

आरटीईची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यात १६ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली. मात्र पुणे जिल्ह्यात तांत्रिक अडचणीमुळे ही प्रवेश प्रक्रिया प्रत्यक्षात २३ फेब्रुवारीपासून सुरू झाली. पुणे जिल्ह्यातून आरटीई प्रवेशासाठी सुमारे एक लाखाच्यावर विद्यार्थ्यांची आनलाईन नोंदणी झाली आहे. त्यापैकी ६३ हजार दोनशे ९२ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज कन्फर्म झाले आहेत. उर्वरीत काही अर्जामधील त्रूटी दूर करण्यासाठी पालकांना अधिक वेळ मिळणे गरजेचे असताना १० मार्चनंतर ही मुदतवाढ देण्यात न आल्याने पालकांची अडचण वाढली आहे. १० मार्च या शेवटच्या दिवशी अनेक पालकांनी अर्ज भरण्यास घाई केली. मात्र आरटीईच्या वेबसाईटमध्ये संध्याकळपासूनच तांत्रिक अडचण निर्माण होऊन ही साईट रात्री बारापूर्वीच बंद पडल्याचे अनेक पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता आली नसल्याचेही काही पालकांनी सांगितले.

RTE
पुणे : बिबवेवाडीतील क्लाइन मेमोरियल स्कुल मध्ये बाऊन्सरकडून पालकांना मारहाण

बरेच पालक हे सायबर कॅफेमार्फत अर्ज दाखल करतात. हे अर्ज भरतानाही मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती भरली जाते. त्याचप्रमाणे बरेचशे पालक या आनलाईन प्रक्रियेबद्दल अनभिज्ञ असल्याने ते इतरांद्वारे आनलाईन अर्ज भरतात. त्यामुळे यामध्येही चुकीची माहिती भरली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे या चुकीची दुरुस्ती करण्यासाठीही पालकांना वेळ मिळणे गरजेचे असल्याचे मत काही पालकांनी व्यक्त केली.

पुणे जिल्ह्याला आरटीईच्या आनलाईन अर्जासाठी काही दिवस कमी मिळाले. मात्र आनलाईन नोंदणी करण्यासाठी काही मिनिटांचाच वेळ लागतो. त्यामुळे आनलाईन नोंदणीसाठी दिलेला अवधी पुरेसा आहे. नोंदणीसाठी अधिक वेळ दिल्यास पुढील प्रक्रियेलाही अधिक वेळ लागण्याची शक्यता असल्याने आनलाईन नोंदणीसाठी मुदत वाढ देण्याचा विचार नाही.

- दिनकर टेमकर, शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com