पिंपरी-चिंचवड

मद्यप्रेमींची 'या' ब्रॅंडला पसंती; आठ दिवसांत रिचवली एवढी दारू...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : लॉकडाउनमुळे 40 दिवसांनंतर सुरू झालेली दारुची दुकाने, त्यामध्येच चढलेला उन्हाचा पारा यामुळे शहरातील मद्यप्रेमी मंडळी बिअरचा आस्वाद घेण्यास सर्वाधिक पसंती देत आठ दिवसामध्ये एक लाख 28 हजार लिटर बिअर रिचवली आहे. दुसऱ्या क्रमांकावर देशी दारू असून, विदेशी मद्य तिसऱ्या स्थानावर आहे. 

दारूची दुकाने सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यासंदर्भातील आदेश येण्यास विलंब झाल्यामुळे पाच मे रोजी शहरातील सर्व दारूची दुकाने उघडली नव्हती. ज्या भागामध्ये दुकाने उघडली गेली, तिथे वाइन, रम, व्हिस्की यांची खरेदी करण्यापेक्षा बिअर घेणाऱ्यांची मोठी झुंबड उडाली होती. दुकाने सुरू झाल्यापासून आतापर्यंत मद्यप्रेमी मंडळी बिअर पिण्यातच अधिक रुची दाखवत आहेत. दारूच्या दुकानांखेरीज शहरात खास बिअरची विक्री करण्यासाठी बिअर शॉपी असून, त्याठिकाणी मद्यप्रेमींची दररोज गर्दी होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बिअरच्या खालोखाल देशी दारूला पसंती दिली जात असून, आठ दिवसांच्या अवधीत सुमारे 60 हजार लिटर देशी दारूची विक्री झाली. उन्हाचा कडाका वाढल्याने विदेशी मद्य पिणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. आतापर्यंत शहरात सुमारे 56 हजार लिटर विदेशी मद्याची विक्री झाली आहे. लॉकडाउननंतर दारू दुकानांसमोर लागणाऱ्या लांबच लांब रांगाची गर्दी आता कमी झाली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

40 दारू दुकाने व 25 बिअर शॉपी बंद 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महापालिकेने शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे त्या परिसरालगत असणारी 40 दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. शहरात केवळ बिअरची विक्री करणाऱ्या बिअर शॉपीची संख्या 75 पर्यंत आहे. सध्या त्यापैकी 25 बिअर शॉपी बंद आहेत. दरम्यान, दारूची विक्री करण्यासाठी सरकारने नियमावली आखून दिली आहे, त्याची अंमलबजावणी होत आहे का, यावर उत्पादनशुल्क विभागाच्या अधिकारी लक्ष ठेवून आहेत. 

शहरात दररोज होणारी मद्यविक्री लिटरमध्ये -

  • देशी मद्य  : सुमारे 8,000 लिटर 
  • विदेशी मद्य : सुमारे 7,000 लिटर 
  • बिअर : सुमारे 16, 000 लिटर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Red Alert : राज्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; २४ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार सरींचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 22 जुलै 2026

Tomato Paratha: कधी खाल्लाय का टोमॅटो पराठा? 20 मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी आज नक्की ट्राय करा

NEET Protest: NEET पेपरफुटीवर राहुल गांधींचे मोदींच्या निवासस्थानासमोर आंदोलन; राहुल-प्रियांका गांधी ताब्यात

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT