Mask-Wear 
पिंपरी-चिंचवड

सावधान! कोरोना परततोय; रुग्णांचा आलेख वाढतोय

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन, ना मास्कचा वापर अशा खबरदारीच्या उपाययोजनांना अनेकांनी तिलांजली दिली आहे. नागरिकांनीसुद्धा बेफिकीर वर्तन सुरू केल्यामुळे आता एकेका दिवशी अडीचशेवर नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या आठवड्यापासून रुग्णांची वाढती संख्या मोठी असल्याने चिंतेत भर पडली आहे. शनिवारी (ता. २०) दोघांचा मृत्यू झाल्यामुळे एकूणच शहरात कोरोनाचा आलेख वाढतानाचे चित्र दिसून येत आहे. 

मागील काही महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले होते. ऑक्टोबर-डिसेंबर २०२०मध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १०० ते १२० पर्यंतच असताना फेब्रुवारीमध्ये रुग्णसंख्या अचानक वाढली आहे. दोघांचा मृत्यू झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९९ टक्के
कोविड रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असतानाच आतापर्यंत १८३० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असले तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर आता शून्य टक्के आहे. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणसुद्धा जवळपास ९९ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले आहे. २८७१ सक्रिय रुग्ण आहेत. चाचणी अहवाल प्रतीक्षेतील रुग्ण संख्या १२३२ असून, विलगीकरण केलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ७४९ आहे. 

पक्षांचे मेळावे, समारंभात गर्दी वाढली
लग्नसमारंभ, राजकीय पक्षांचे मेळावे, आंदोलने, गेट टू गेदर पार्ट्यांचे आयोजन सध्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. विशेष म्हणजे लग्न किंवा रिसेप्शनमध्ये ५० लोकांची मर्यादा आखून दिली असली, तरी अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत आहे. राजकीय मेळाव्यामध्ये सुद्धा मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. 

धोकादायक फेब्रुवारी
सुरुवातीपासूनच फेब्रुवारी या महिन्यात कोरोनोची दुसरी लाट येईल. हा महिना धोकादायक असणार याचा इशारा आरोग्ययंत्रणेसह महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेला होता. आता एकाच दिवशी पुन्हा अडीशेच्यावर नवे रुग्ण आढळून आले आहेत.

आठवडाभरात रुग्णसंख्या

  • १३ फेब्रुवारी    १२०
  • १४  फेब्रुवारी    १५०
  • १५ फेब्रुवारी    १००
  • १६ फेब्रुवारी    १४२
  • १७ फेब्रुवारी    २२७
  • १८  फेब्रुवारी    १८०
  • १९ फेब्रुवारी    २८१
  • २०  फेब्रुवारी    २०२

कोरोना संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेचे प्रशासन सज्ज आहे. आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे. औषधी आणि किटदेखील पुरेसे आहेत. बालनगरी हॉस्पिटल या कोविड केअर सेंटरमध्ये २५० बेडची व्यवस्था केली आहे. ही व्यवस्था आज देखील कायम आहे. ऑटो क्लस्टर कोविड सेंटर, जिजामाता हॉस्पिटल, वायसीएम या रुग्णालयात बेडसची व्यवस्था आहे.
-  डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी, महापालिका

वायसीएम रुग्णालयात  ६० आयसीयू बेड रिकामे आहेत. व्हेंटिलेटरदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे आवश्यक ती पायाभूत सुविधा उपलब्ध आहे. मनुष्यबळ, औषधे आणि ऑक्सिजनसाठा देखील पुरेसा आहे. पीपीई किट, एन-९५ मास्क उपलब्ध आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांचे किटदेखील पुरेसे आहेत. 
- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT