Police 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड पोलिसांनी राबवले ऑल आउट ऑपरेशन

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी चिंचवड पोलिसांनी राबवलेल्या ऑल आउट ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये विविध गुन्ह्यात फरारी असलेले आरोपी हाती लागले. या ऑपरेशन अंतर्गत सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत राहणारे हिस्ट्रीशीटर, तडीपार आरोपी, पॅरोलवर सुटलेले आरोपी, टॉप 25 गुन्हेगार, विविध गुन्ह्यातील फरारी आरोपी यांची तपासणी करून त्यांना ताब्यात घेण्यावरून भर देण्यात आला. पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली सहा सहायक पोलिस आयुक्त, २६ निरीक्षक, ६२ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक ३२० कर्मचारी तसेच तपास पथकाकडील २६ अधिकारी ७८ कर्मचारी यांची पोलिस ठाणेनिहाय संयुक्त पथके तयार करण्यात आली होती.

या ऑपरेशनदरम्यान एकूण ९३ हिस्ट्रीशीटर गुन्हेगार तपासले त्यापैकी ५७ घरी मिळून आले. ११७ माहितगार गुन्हेगार तपासले असता ७५ घरी मिळून आले. ७६ तडीपार आरोपींपैकी एक आरोपी आढळून आला. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. ९७ फरारी आरोपी तपासले असता त्यातील सहा जण मिळून आले. त्यांना संबंधित पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या ऑपरेशनमध्ये सीआरपीसी १०७ प्रमाण1 २७ आरोपींवर तर सीआरपीसी ११० प्रमाणे सात आरोपींवर कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाला रेकॉर्डवरील गुन्हेगार निखिल तरकसे हा संशयितरित्या आढळला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चाकू सापडला. या आरोपीवर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहे. तसेच चिखली पोलिसांनी ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी विशाल भगवान मोरे (वय २१, रा. चिखली) यालाही ताब्यात घेतले. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने प्रवीण बळीराम ओगले (वय ३६, रा.आळंदी), रवींद्र सुधाकर आवटे (वय ३४, रा. भोसेगाव, चाकण) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुस जप्त केले. 

गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने देहूरोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरारी आरोपी नाजिन खलील शेख याला ताब्यात घेतले. त्याच्यावर यापूर्वी चार गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT