PCMC Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : रुग्णालये व दवाखान्यातील मानधनावरील कर्मचाऱ्यांना मिळणार भत्ता

महापालिकेचे आठ रुग्णालये व २७ दवाखाने आहेत. तसेच, कोरोना रुग्णांसाठी दोन जम्बो रुग्णालये व आठ ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेच्या (Municipal) वायसीएमसह (YCM) अन्य रुग्णालयात (Hospital) मनुष्यबळाची आवश्‍यकता होती. त्यासाठी डॉक्टर (Doctor) व नर्स (Nurse) यांच्यासह प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Technician) आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची (Employee मानधनावर (Honorarium) भरती (Recruitment) केलेली आहे. त्यांना एकत्रित मानधनाव्यतिरिक्त सहा महिन्यांसाठी कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता (Incentive Allowance) एप्रिल महिन्यापासून दिला जाणार आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. (Allowance for honorarium employees of municipal hospitals and dispensaries)

महापालिकेचे आठ रुग्णालये व २७ दवाखाने आहेत. तसेच, कोरोना रुग्णांसाठी दोन जम्बो रुग्णालये व आठ ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. येथील रुग्णसेवेसाठी महापालिकेच्या कायम सेवेतील डॉक्टर, नर्स व अन्य मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे सहा महिने कालावधीसाठी मानधन तत्त्वावर वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचारी सेवेत घेतलेले आहेत. मात्र, महापालिकापेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये मिळणारे मानधन जास्त असल्याने अनेक जण महापालिका सेवेत रुजू होत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय सेवेत मनुष्यबळाची कमतरता भासते. त्याचा परिणाम रुग्णसेवा व उपचारावर होऊ शकतो. ते टाळण्यासाठी व महापालिका आणि खासगी संस्था यांच्यातील मानधनाच्या रकमेतील तफावत दूर करण्यासाठी मानधनावरील डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांना एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिने कालावधीसाठी प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.

दरमहा प्रोत्साहन भत्ता (रुपयात)

१५ हजार - डॉक्टर व अधिकारी

१० हजार - नर्स व पॅरामेडिकल स्टाफ

५ हजार - तंत्रज्ञ व चतुर्थ श्रेणी कर्मचारी

महापालिका परिसरातील इतर रुग्णालयांत महापालिका देत असलेल्या किमान वेतन दरापेक्षा जादा वेतन मिळत आहे. त्यामुळे वर्ग एक ते चारमधील वैद्यकीय अधिकारी, नर्स, तंत्रज्ञ, चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. काही जण महापालिका सेवेत रुजू झाल्यानंतरीही राजीनामा देऊन खासगी सेवा स्वीकारतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोविड भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.

- नामदेव ढाके, पक्षनेता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

IND vs ZIM: भारत आणि झिम्बाब्वेचे खेळाडू दुसऱ्या T20I सामन्यात हाताला काळी पट्टी बांधून का उतरले? जाणून घ्या खरं कारण

सध्या काय करतात 'पंढरीची वारी' चित्रपटातील कलाकार? बालकलाकारासह अनेकांचं निधन; केवळ तिघेच जिवंत

Karjat Lonavala railway block : कर्जत-लोणावळा घाटातील तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम वेगात; २५ ते २८ जुलैदरम्यान अनेक एक्स्प्रेस रद्द

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर! शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार कोण पाहणार? मोदी सरकारने 'या' मंत्र्यावर सोपवली जबाबदारी

SCROLL FOR NEXT