पिंपरी-चिंचवड

दारूबद्दल बोलल्याचा त्याला असा आला राग; त्याने थेट आई, मुलावरच...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : लॉकडाउनमध्ये महसूल वाढविण्यासाठी सरकारने दारूचा जणू जीवनावश्‍यक वस्तूंमध्येच समावेश केल्याने मद्यपींनी पोटाला अन्न खाण्यापेक्षा दारूलाच अधिक महत्व दिल्याचे दिसून येत आहे. अशीच घटना भोसरी येथे घडली. 'घरात खायला काही नाही आणि तु दारू कशाला घेऊन आला', असे म्हटल्याच्या कारणावरून मद्यपी मुलाने आपल्या स्वत:च्या आई व मुलावर सत्तूरने वार करून मारहाण केली. 

लॉकडाउनमध्ये हाताला काम नसल्याने अनेकांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. पोटाची भूक भागविण्याची चिंता सतावत आहे. अशातच सरकारने महसूल वाढविण्यासाठी दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही बाब मद्यपींसाठी आनंददायी ठरली. दारूच्या दुकानांपुढे लांबलचक रांगा लागल्या. दारू पिऊन झिंगाट होण्यासाठी घरात खायला अन्न नाही, याचाही विचार न करता अनेकांनी दारू खरेदीला प्राधान्य दिले. सध्या मद्यपींना कुटुंबीयांच्या पोटाची भूक भागविण्यापेक्षाही स्वत:साठी दारू घेणे महत्वाचे वाटत आहे. भोसरीत तर एकाने दारूसाठी स्वत:च्या आई व मुलावर वार केल्याची धक्कादायक घटना घडली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

धनराज रंगनाथ झाडे (वय 38, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीची आई कौशल्या रंगनाथ झाडे यांनी फिर्याद दिली. रविवारी (ता. 10) रात्री आरोपी धनराज घरी आला, त्यावेळी त्याने सोबत दारू आणली होती. त्यामुळे त्याची आई कौशल्या या त्याला 'घरात खायला काही नाही आणि दारू का घेऊन आला' म्हणाल्या. याचा राग आल्याने धनराज याने आई कौशल्या यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर सत्तूरने कौशल्या यांच्या हातावर वार केले. त्यात कौशल्या जखमी झाल्या. त्यानंतर स्वत:च्या मुलावरही वार करून जखमी केले. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

SCROLL FOR NEXT