ganesha.jpg 
पिंपरी-चिंचवड

Video : सांगवीतील व्यावसायिक म्हणताहेत, गणराया कोरोनाचे संकट टळू दे! 

रमेश मोरे

जुनी सांगवी (पुणे) : कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांसह सर्वच क्षेत्रातील छोटे उद्योग डबघाईला आले आहेत. सण उत्सवाला मर्यादा आल्याने या सण उत्सवावर अवलंबून असलेले अनेक उद्योग बंद आहेत. कोरोनाचा पिंपरी चिंचवड व पुण्यातील दिवसें दिवस वाढणारा प्रादुर्भाव पाहता यंदाचा गणेश उत्सव कुंभार व्यावसायिकांसमोर अडचणीचा ठरण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी कुंभार व्यावसायिक कलाकारांबरोबरच सर्वसामान्यांनामधूनही गणेश उत्सवाची ओढ असते. या उत्सवावर अनेक व्यावसाय उद्योग अवलंबून आहेत.

शोभेच्या वस्तू, मखर, इलेक्ट्रीक साहित्य, शोभेच्या विद्युत माळा, पूजा साहित्य आदी व्यवसाय गणेश उत्सवावर अवलंबून असतात. नागरिकांबरोबरच कुंभार व्यावसायिक मुर्तीकारांनाही गणेश उत्सवाची ओढ असते. जुनी सांगवीतील कुंभारवाड्यातील जवळपास वीस कुटुंब या व्यवसायात आहेत. फेब्रुवारी महिन्यापासूनच कच्चा माल आणणे, मुर्त्या तयार करून मागणीनुसार रंगकाम तयारीला लागणे या दरवर्षीच्या लगबगीवर सध्या कोरोनामुळे विरजण पडले आहे. तरीही ऑगस्टमधे येणा-या गणेश उत्सवासाठी मूर्ती तयार करण्याच्या कामाला कारागीरांनी सुरूवात केली आहे. जुनी सांगवीतून पिंपरी चिंचवड शहरासह पुण्यात येथील गणेश मूर्त्यांना मोठी मागणी असते.

सध्या धाडस करून कारागिरांनी मुर्ती कामाला सुरूवात केली आहे. मात्र, यास पुढील काळात कसा प्रतिसाद मिळतो त्यावर सगळी आर्थिक गणितं अवलंबून आहेत. त्यामुळे गुंतवणूक करावी की नाही मेहनत वाया तर जाणार नाही ना अशी चिंता हे कलाकार व्यक्त करत आहेत. कारण लॉकडाउनच्या काळात माठ विक्री न झाल्याने सर्वांनाच आर्थिक फटका बसला आहे. तर यावर्षी मोठ्या उत्सवाला बंधन असल्याने सोसायट्या, मंडळांना लागणारी मोठी मूर्ती करणार नाही घरगुती लागणा-या मुर्त्या तयार करत आहोत.मात्र यातही नेहमी सारखा उत्साह राहतो की नाही याची काळजी वाटतेय असे मुर्तीकार कलाकार अनिल कुंभार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणातील महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करताय? तर थांबा, पोलिसांची पहिली कठोर कारवाई

8th Pay Commission Update : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार ? आठव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टबाबत सरकारकडून मोठी अपडेट !

डम्पर मालकाने पगार थकवला; पैशासाठी सतत विनवणी, तरीही हाती निराशा, चालक संतापला अन्... थरारक व्हिडिओ व्हायरल

विना ID प्रूफ वापरता येणार नाही फेसबुक-इंस्टाग्राम! मोदी सरकारने तयार केला 'डिजिटल चक्रव्यूह'; जाणून घ्या नवा नियम

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

SCROLL FOR NEXT