Anxiety among the citizens due to rumors about corona in Sangvi Pimple Gurav area 
पिंपरी-चिंचवड

नागरिकांनो, अफवांना बळी पडू नका! सांगवी पिंपळे गुरवमध्ये पसरतायेत 'या' अफवा

मिलिंद संधान

नवी सांगवी (पुणे ) : मागील चार महिन्यांपासून संपुर्ण जगासह आपण कोरोना महामारीशी लढा देत आहोत. यात खासकरून शासकीय डॉक्टर, परिचारीका, नर्सेस, वॉर्डबॉय, पोलिस यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र आपली सेवा देत आहेत. अशा वेळी आपल्यासारख्या सामान्यांनी किमान शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करून कोरोनाच्या लढ्यात साथ दिली पाहिजे. त्यातच पावसाळी हवा आणि अनलॉक केल्याने ही महामारी अधिकच बळावली आहे. त्यातच काही समाजद्रोही विनाकारण अफवा पसरवून घबराट पसरवीत आहेत. त्यामुळे सांगवी पिंपळे गुरव परिसरात कोरोनापेक्षा आता या अफवांनाच लोक जास्त घाबरत आहेत. 

पिंपळे गुरव येथील वैद वस्ती येथे काही दिवसांपुर्वी कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आढळले. माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेविका यांचा त्यात समावेश होता. ते बरे होऊन घरी परतलेही परंतु आजही त्यापरिसरात कधी छप्पन तर, कधी नव्वद पॉझिटिव्ह सापडल्याच्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे येथील स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांचे फोन खणखणत असून याबाबत विचारणा केली जात आहे.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोन दिवसांपासून नवी सांगवीतील कृष्णा चौकात 'नऊ भाजीवाल्यांना कोरोना झालाय, त्यांच्याकडून कोणीही भाजी खरेदी करू नका ' असा मेसेज व्हायरल झालाय. त्यामुळे येथील लोकांमध्ये नाहक घबराट पसरल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अफवांना सर्वच थरातील म्हणजे अडाणी, सुशिक्षित, स्त्रीपुरूष, लहानमोठे, गरिब आणि श्रीमंत असे सर्वच बळी पडत आहेत. परंतु आता नागरिकांनी धीट होऊन अशा अफवांना बळी न पडण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सांगवी येथील इंदिरा गांधी रुग्णालयाच्या प्रमुख व जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ विजया आंबेडकर म्हणाल्या, " नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग पाळून मास्क घालून वावर केला पाहिजे. कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरीत महापालिका रूग्णालयाशी संपर्क साधायचा आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने सारथी हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सर्वांनीच सहकार्य करावे. " 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT