RTE
RTE  Esakal
पिंपरी-चिंचवड

प्रवेशासाठी निवासी पुरावा म्हणून‘११ महिने’भाडेकरारास मान्यता

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शिक्षण हक्क कायद्याच्या २५ टक्के कोट्यातील जागांसाठी सध्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. अनेक पालकांचे अर्ज निवासी पुराव्यामुळे अपात्र झाले आहेत. परिणामी निवासी पुराव्यामध्ये शिक्षण संचालनालयाने सुधारणा केल्या आहेत. यात आता निवासी पुरावा म्हणून अकरा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा नोंदणीकृत भाडेकरार ग्राह्य धरला जाणार आहे. याबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी नवीन परिपत्रक जाहीर केले आहे. परिणामी, अनेक पालकांना प्रवेशासाठी दिलासा मिळणार आहे.

यंदा आरटीई प्रवेशासाठी भाडे करार हादेखील निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याच्या आदेश दिले आहेत. पण पालकांना रहिवासी किंवा निवासी पुराव्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत देणे बंधनकारक करण्यात आले होते. भाडेकरार ऑनलाइन अर्ज भरण्याच्या तारखेपूर्वीचा असावा तसेच त्याचा कालावधी एक वर्षाचा असणे बंधनकारक असावा, असे शासनाने जाहीर केले होते. पण भाडेकरार हा ११ महिने किंवा २२ महिन्यांचा असतो, अशा परिस्थितीत पालकांना भाडेकरारांमुळे प्रवेशास अडचणी आल्या आहेत. त्यामुळे बहुतांश पालकांनी ११ महिन्यांचा भाडेकरार मान्य करण्याची मागणी शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांच्याकडे केली होती. अनेक पालकांनी दूरध्‍वनीद्वारे ही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

दरम्यान, अशातच काही पालकांनी भाडेकरार केलेले नाहीत, या पालकांनाही प्रवेशप्रक्रियेत अनेक अडचणी आल्या आहेत. सरकारने यावर काहीतरी मार्ग काढावा, अशी मागणी पालक संघटनांतर्फे करण्यात आली होती. प्रक्रियेदरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना २९ एप्रिल या कालावधीत संबंधित पडताळणी केंद्राकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी व तात्पुरता प्रवेश निश्चित करत आहेत, अशावेळी पालकांना भाडेकरारावरून अडचणी आल्या आहेत. त्यामुळे आता प्रवेशासाठी आवश्यक भाडेकरारात शिक्षण संचालनालयाने सुधारणा केल्या आहेत. निवासी पुराव्यासाठी अकरा महिन्याचा भाडेकरार ग्राह्य धरण्यास मान्यता दिली आहे, याबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी नवीन परिपत्रक जाहीर केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT