jail.jpg 
पिंपरी-चिंचवड

'तो' बहाद्दर सतरा वर्षांपासून वेश बदलायचा अन्...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : वारंवार पेहराव बदलून तब्बल सतरा वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अट्टल दरोडेखोराला जेरबंद करण्यात अखेर गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला यश आले आहे. या गुन्हेगारावर राज्यातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे तब्बल वीस गुन्हे दाखल आहेत. 

रघुवीरसिंग चंदुसिंग टाक (वय 51, रा परतूर जि. जालना) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. 27 जुलै 2003 ला पहाटे सव्वा तीन वाजता आरोपींनी देहूरोड येथील धनराज केसरीमल सोनिगरा यांच्या सोनिगारा ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकला. त्यांच्या मुलीच्या गळ्याला चाकू लावून 21 तोळे सोन्याचे दागिने व आठ लाख 50 हजारांची रोकड लंपास केली होती. याबाबत देहुरोड पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. रघुविरसिंग हा मागील सतरा वर्षांपासून फरारी होता. सतत पेहराव बदलून पोलिसांना गुंगारा द्यायचा. गुन्हे शाखा युनिट पाचचे पथक त्याच्या मागावर होते.

दरम्यान, तो जालना येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अखेर बुधवारी (ता.29) त्याला जालना येथून ताब्यात घेतले.  त्याच्यावर जालना येथे आठ, औरंगाबाद, अकोला, नागपूर, बीड, मुंब्रा व पुण्यातील चत:श्रृंगी येथे प्रत्येकी एक, तर वाशिम दोन व बीड येथे चार गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दरोडा, लूटमार, घरफोडी, शस्त्र बाळगणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

ही कारवाई युनिट पाचचे वरिष्ठ निरिक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक राम गोमारे, कर्मचारी फारुक मुल्ला, राजकुमार ईघारे, दयानंद खेडकर, भरत माने, धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसोडे, सावन राठोड, संदीप ठाकरे, मयुर वाडकर, ज्ञानेश्‍वर गाडेकर, स्वामीनाथ जाधव, नितीन बहिरट, शामसुंदर गुट्टे, गणेश मालुसरे, धनंजय भोसले, गोपाळ ब्रह्मांदे यांच्या पथकाने केली.

असाही योगायोग 
सतरा वर्षापुर्वी 29 जुलैला दरोड्याची घटना घडल्यानंतर आरोपी फरारी होता. त्याला तब्बल सतरा वर्षांनी जेरबंद करण्यात यश आले. दरम्यान, जेरबंद केल्याची तारीखही 29 जुलैच असल्याने आरोपीच्या अटकेचाही योगायोगच असल्याचे बोलले जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: पुण्यात १७ वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, २१ वर्षीय तरुणानं फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी!

Jawkheda Thombre farm fire: जवखेडा ठोंबरे येथे शेतकऱ्याच्या शेडला भीषण आग; ज्वारी कडबा, भुस व औजारे जळून सुमारे ३ लाखांचे नुकसान

Latur sandalwood smuggling news: लोहा-चाकूर परिसरात भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये लपवलेले ३६.७५ लाखांचे चंदन जप्त; तिघांना अटक, ५१.९६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT