पिंपरी-चिंचवड

Video : सायन्स पार्कमधील 'हा' प्रकल्प कोरोनामुळे अडचणीत!

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : कोरोनाच्या संकटामुळे सायन्स पार्कमध्ये उभारण्यात येत असणारा तारांगणाचा प्रकल्प अडचणीत सापडला आहे. महापालिका प्रशासनाने मे महिन्यामध्ये हा प्रकल्प खुला करण्यासाठी वेगात काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी अमेरिका, फ्रान्समधील इंजिनिअर देखील मार्च महिन्यात दाखल झाले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अवघ्या 20 दिवसांमध्ये त्यांना गाशा गुंडाळून मायदेशी जावे लागले होते. आता या इंजिनिअर्सना पुन्हा कामासाठी बोलवण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. 

दरम्यान, अमेरिकेमध्ये कोरोनाचा फैलाव अद्याप कमी झालेला नाही. फ्रान्समध्ये लॉकडाउन काढण्यात आला असला, तरी अद्याप कोरोना तिथून हटलेला नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातही कोरोना असल्यामुळे हे दोन्ही इंजिनिअर परत येतील का, याविषयी प्रश्‍नचिन्ह आहे. तारांगणसाठी तयार करण्यात आलेला डोम अमेरिकेचा असून डिजिटल यंत्रणा फ्रान्समधील कंपनीने तयार केलेली आहे. संपूर्ण यंत्रणा बसवण्याचे काम जपानमधील कंपनीला दिलेले आहे, त्यांचा इंजिनिअर देखील इथे कामासाठी येणार होता. मात्र, कोरोनामुळे तो येऊ शकलेला नाही. 

तारांगण प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना अंतरीक्षाची सफर घडवली जाणार आहे. मुंबईतील नेहरु तारांगण केंद्रासारख्या सुविधा याठिकाणी राहाणार आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र उपयुक्‍त ठरणार आहे. सायन्स पार्कमधील या केंद्रात सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हे तारांगण उभे करण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत त्यापैकी बहुतेक काम पूर्ण झाले असले तरी विदेशातील यंत्रणा बसवण्याचे मुख्य काम अद्याप अपूर्ण आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतरच तारांगण नागरिकांसाठी खुले करता येणे शक्‍य होणार आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंजिनिअर परतले तरी ही आहे अडचण... 

कोरोनाचे संकट इतक्‍यात कमी होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे विदेशातील इंजिनिअर कामासाठी जरी परत आले, तरी त्यांना 15 दिवस क्‍वारंटाइन राहावे लागणार आहे, त्यामुळे कामाचे दिवस वाया जाउन या प्रकल्पाला उशीर होऊ शकतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनाच्या संसर्गामुळे तारांगणचा प्रकल्प लांबणीवर पडणार आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून विदेशातील इंजिनिर्असना परत आणण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. या इंजिनिअर्सच्या समन्वयकांशी त्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर देखील आतापर्यंत दोन वेळा चर्चा झाली आहे. आता लॉकडाउन हळूहळू खुला होत असताना हे काम लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहे. 

- प्रवीण तुपे, अतिरिक्‍त आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh : आता मी खुला सांड... तिकीट नाकारलेल्या ब्रिजभूषणनं कोणाला दिलं आव्हान?

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" फेम अभिनेता भूषण पाटील करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे पण..."

Nashik News : मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या चाकाखालून धुर! प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या

Yogi Adityanath : पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना भारतात थारा नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT