Atmaja NGO Educational support to three hundred girls student sakal
पिंपरी-चिंचवड

Atmaja NGO: आत्मजाकडून सावित्रीच्या तीनशे लेकींना शैक्षणिक आधार

आत्मजामध्ये वंचित पार्श्वभूमीच्या हुशार तरुणींना व्यावसायिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत

सकाळ वृत्तसेवा

बेलाजी पात्रे

वाकड : वंचित घटकांतील अभ्यासात हुशार मात्र घरच्या आर्थिक परस्थितीपुढे हतबल झालेल्या गरजू होतकरू विद्यार्थिनींना व तरुणींना शिक्षणाच्या प्रवाहात आणत त्यांचे संगोपन करणाऱ्या वाकड येथील आत्मजा या स्वयंसेवी संस्थेने गेल्या दोन वर्षात तीनशे विद्यार्थिनींच्या जीवनाला आकार देत त्यांना स्वतःच्या पायावर उभे कारण्याचा विडा उचलला आहे.

आत्मजा फाऊंडेशन ही बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० अंतर्गत नोंदणीकृत समाजसेवी संस्था आहे. आत्मजामध्ये वंचित पार्श्वभूमीच्या हुशार तरुणींना व्यावसायिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देत त्यांना मजबूत मूल्यांसह आत्मविश्वासी बनविण्यासाठी कार्य केले जाते.

पुण्यात बीई, बीटेक, एमबीबीएस आणि वैद्यकीय क्षेत्रातील इतर कोणत्याही पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या किंवा इयत्ता दहावीत शिकणाऱ्या वंचित पार्श्वभूमीच्या विद्यार्थिनींना गुणवत्ता व गरजेवर आधारित शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

भारतात सुमारे ४० टक्के किशोरवयीन मुली (१५ ते १८ वयोगटातील) अल्पवयीन विवाह, सांस्कृतिक वर्जना, भावंडांची काळजी यामुळे शैक्षणिक जीवनाला छेद देतात शिक्षणापासून दुरावतात. मात्र, मुली ह्या समाज बदलाचा मुख्य घटक असून सामाजिक, आर्थिक विकास सुधारण्यात त्या महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी आता आधार दिल्यास स्वतःसह देशाच्या प्रगतीत त्या योगदान देतील असे मत आत्मजाचे आहे.

इयत्ता ९, १०, ११, १२ वी मध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविल्या तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या मुलींची निवड सुस्पष्ट निवड प्रक्रियेद्वारे केली जाते आणि त्या विद्यार्थिनी त्यांच्या पायावर उभे होईपर्यंत त्यांना पाठिंबा दिला जातो. शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी आमच्या www.aatmaja.org या वेबसाइटवर अर्ज करा. किंवा 7028009200,7276264971 या क्रमांकावर व्हॉटस अप करा असे आवाहन संचालकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

Sunday Special Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड पिझ्झा, लगेच नोट करा रेसिपी

दैव की कर्म?

SCROLL FOR NEXT