Crime Sakal
पिंपरी-चिंचवड

मारहाण केल्याप्रकरणी निवृत्त पोलिस अधिकाऱ्यासह चार साथीदारांवर अ‍ॅट्रोसिटी

जमिनीच्या वादातून जातिवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी निवृत्त सहायक पोलिस आयुक्तासह त्याच्या चार साथीदारांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - जमिनीच्या वादातून जातिवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण (Beating) केल्याप्रकरणी निवृत्त सहायक पोलिस आयुक्तासह (retired police officer) त्याच्या चार साथीदारांवर अ‍ॅट्रोसिटीचा (Atrocity) गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. गणपत माडगुळकर असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी विशाल नंदू वाघमारे (वय ३२, रा. गोल्ड फिंगर सोसायटीसमोर, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Atrocity on four accomplices including a retired police officer connection beating)

फिर्यादी यांची वाकड गावठाण येथे जमीन असून, या जमिनीचा दिवाणी न्यायालयात वाद सुरू आहे. दरम्यान, २५ फेब्रुवारीला मंडल अधिकारी यांनी या जमिनीची ताबा कारवाई सुरु केली होती. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास फिर्यादी तेथे रस्त्यावर उभे असताना, ही जमीन खरेदी करणारे माडगुळकर व त्यांच्या चालकाने मोटार अंगावर घातली. त्यावेळी माडगुळकर यांनी जातिवाचक शिवीगाळ करून कोयता दंडावर मारला. तर त्यांच्या चालकाने डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. काही वेळाने त्यांचे इतर साथीदारही आले.

फिर्यादीचा भाऊ तुषार वाघमारे भांडण सोडवण्यासाठी आला असता, त्यालाही जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. त्याठिकाणी नातेवाईक महिला आली असता त्यांनाही शिवीगाळ केली. याप्रकरणी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमासह, मारहाण, शिवीगाळ आदी कलमांतर्गत वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT