पिंपरी-चिंचवड

दिसेल त्या वाहनावर कोयते मारून माजवली दहशत

एकावर प्राणघातक हल्ला; भररस्त्यात घडलेल्या घटनेमुळे भीतीचे वातावरण

मंगेश पांडे

पिंपरी : रस्त्यावरील वाहने अडवून दिसेल त्या वाहनावर कोयते मारत दोघांनी दहशत माजवली. यामध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्लाही केली. ही घटना पिंपळे निलखमधील टकले चौक येथे भररस्त्यात घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

प्रतीक संतोष खरात, चेतन जावरे (दोघेही रा. पिंपळे निलख) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जितेंद्र छोटीलाल ठाकूर (वय २३, रा. नदी पात्रालगत पत्र्याच्या शेडमध्ये टकले चौक, पिंपळे निलख, मूळ-झारखंड) यांनी फिर्याद दिली आहे.

शनिवारी (ता. ३) रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या रूममध्ये जेवण बनवत असताना आरोपी त्यांच्याकडे पाणी पिण्यासाठी आले. यावेळी आरोपी जावरे याने फिर्यादीकडे पैसे मागितले असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून खरात याने त्याच्याकडील कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारून प्राणघातक हल्ला केला. तसेच या आरोपींनी रस्त्यावरील चारचाकी, दुचाकी वाहने अडवून वाहनांवरही कोयते मारले.

वाहनांच्या काचा फोडल्या. आरोपीनी वाहनांचा पाठलाग केला असता काही जणांनी जिवाच्या भीतीने आपली वाहने रस्त्यातच सोडून पळ काढला. तर समोरची घटना पाहून अनेकांनी वाहने रस्त्यातूनच माघारी फिरवली. दहा ते पंधरा मिनिटे आरोपींचा हा राडा सुरु होता. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपीना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: जसप्रीत बुमराहला नडला, त्या सैम आयुबचा करेक्ट कार्यक्रम केला! पाकिस्तानने १२ चेंडूंत गमावले ३ फलंदाज

Nagpur Mumbai Duronto Express : नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या वेळेत बदल; काही गाड्यांचे स्थानकही बदलणार, कधीपासून लागू होणार वेळापत्रक?

IND vs PAK T20 WC: इशान किशनची फटकेबाजी, भारताने उभे केले सर्वात मोठे लक्ष्य; पाकड्यांनी ६ स्पिनर्स वापरले, तरीही...

Mulund: २ कोटींची भरपाई, सरकारी नोकरी अन्...; मुलुंड दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या रामधनींच्या कुटुंबियांच्या मागण्या काय?

Mumbai High Court : मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, मुलीच्या हिताला प्राधान्य; वडिलांची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT