attack on one under the influence of alcohol in Wadmukhwadi  
पिंपरी-चिंचवड

दारुच्या नशेत झाला किरकोळ वाद; फावड्याच्या दांडक्याने केला डोक्‍यात वार

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : दारू पिऊन झालेल्या भांडणात एकाच्या डोक्‍यात फावड्याच्या दांडक्‍याने मारहाण करून प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना वडमुखवाडी येथे घडली. याप्रकरणी एकाला अटक केली आहे. 

जितू संकललाल यादव (वय 26, रा. लेबरकॅम्प, वडमुखवाडी, चऱ्होली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर अजय शहाणे असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार मोहन बवले (रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुरुवारी (ता.1) रात्री पावणे नऊच्या सुमारास फिर्यादीच्या मालकीच्या वडमुखवाडी येथील पत्राशेडमध्ये यादव व शहाणे यांच्यात दारू पिऊन किरकोळ भांडण झाले. यामध्ये शहाणे याने यादवच्या हाताला चावा घेतला. यामुळे चिडलेल्या यादवने शहाणे याच्या डोक्‍यात फावड्याच्या दांडक्‍याने बेदम मारहाण केली. यामध्ये शहाणे गंभीर जखमी झाला. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

गुंड अप्पा लोंढे खून प्रकरणात संशयितांवर आरोप निश्‍चिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,100 अंकांनी वाढला, निफ्टी 23,900 पार; सेन्सेक्स-निफ्टीत अचानक वाढ का?

शांतता कराराची घोषणा पण ट्रम्पसमोर इराणच्या ३ मोठ्या अटी, अमेरिका-इराण डीलमध्ये १४ मुद्दे महत्त्वाचे

Fifa World Cup 2026: ब्राझीलला बरोबरीचेच समाधान; मोरोक्कोसमोर पाच वेळच्या विजेत्यांचा कस, व्हिनिसियसच्या गोलने दिलासा

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : पुण्यात आजपासून पाणी कपात

SCROLL FOR NEXT