पिंपरी-चिंचवड

पोलिसांवरील हल्ले थांबता थाबेना!

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांवरील हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. काळेवाडी, बोपखेल, दापोडी येथील पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच कुदळवाडी येथे पुन्हा पोलिसावर हल्ला झाला. मागील महिनाभरातील ही चौथी घटना आहे. वारंवार हल्ले होत असल्याने नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.

नितीन अप्पा खेसे (वय 30) असे हल्ला झालेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी सुमित माणिक देशमुख (वय 28, रा. नेहरूनगर, पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली. फिर्यादी नितीन खेसे हे गुन्हे शाखेच्या युनिट एकमध्ये कार्यरत आहेत. मंगळवारी (ता. 26 ) रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी हे वाकड पोलिसांच्या कस्टडीतून पळून गेलेल्या आरोपीच्या शोधासाठी जात होते. दरम्यान, केएसीबी चौकाकडून कुदळवाडी चौकाकडे जाणाऱ्या रोडवर आरोपी त्याची (एमएच 12 डी डी 7272) मोटार उभी करून सतत हॉर्न वाजवीत होता. त्यावेळी फिर्यादीने त्यांचे ओळखपत्र दाखवून हॉर्न वाजवू नका, असे सांगून आरोपीला मोटार बाजूला घेण्यास सांगितले.  त्यावर 'मी गाडी बाजूला घेणार नाही, काय करायचे ते करा' असे म्हणत आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच दमदाटी करीत फिर्यादीच्या कानाखाली मारून धक्काबुक्की केली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी  दिवस रात्र झटणाऱ्या पोलिसांवर हल्ले सुरूच आहेत. मनुष्यबळ अपुरे असतानातही तारेवरची कसरत करीत बंदोबस्त्याचे योग्य नियोजन केले जात आहे. मागील दोन महिन्यांपासून पोलिसांची  झोप उडाली आहे. तरीही नागरिकांसाठी चोवीस तास रस्त्यावर असलेल्या पोलिसावर हल्ले सुरूच आहेत.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दापोडी -बोपोडी पुलाजवळील पवार वस्ती येथील स्मशानभूमीजवळ 13 मे रोजी गर्दी जमली होती. ही गर्दी पांगवित असताना दहा जणांच्या टोळक्याने सिद्धार्थ दत्तू वाघमारे (वय 31) या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली

बोपखेल फाटा येथील नाकबंदीच्या ठिकाणी 10 मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वाहन तपासणीसाठी थांबविल्याच्या रागातून एकाने पोलिस हवालदार संजय कामठे, पोलिस कॉन्सटेबल उमेश जाधव यांना दगड फेकून मारीत धक्काबुक्की, शिवीगाळ करून इतरांनाही दगड मारण्याचा प्रयत्न केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोपीला पोलिसांच्या वाहनातून पोलिस ठाण्यात नेत असताना आरोपीने वाहनाच्या खिडकीच्या काचेवर डोके आपटून काच फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. यासह मागील महिन्यातही काळेवाडी येथे बंदोबस्तावरील पोलिसावर हल्ला झाल्याची घटना घडली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विनाकारण रस्त्यावर फिरत असताना हटकल्याने तिघांनी मिळून शंकर विश्वंभर कळकुटे या पोलिसावर हल्ला केला. या घटना ताज्या असतानाच मंगळवारी पुन्हा पोलिसावर हल्ला झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT