Auction at Bhandara festival in Moshi Nageshwar Maharaj.jpg 
पिंपरी-चिंचवड

पुणे : नागेश्‍‍वर महाराजांचा विडा ९१ लाखांना; मानाच्या ओटीची १६ लाखांना बोली

सकाळवृत्तसेवा

मोशी : ९१ लाख एक वार एक... ९१ लाख एक वार दोन... अन् ९१ लाख एक वार तीन.., असा खर्जातील आवाज घुमत होता येथील श्री नागेश्‍वर महाराज देवस्थान सभागृहामध्ये भंडारा उत्सवातील महाराजांना अर्पण केलेल्या वस्तूंच्या लिलावाप्रसंगी. 

मानाच्या विड्याच्या लिलावासाठी लाखोंची बोली लावण्यासाठी श्री नागेश्‍वर महाराज भंडारा उत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. या उत्सवात यंदाच्या लिलावामध्ये मानाच्या विड्याला तब्बल ९१ लाखांची बोली लावली गेली. हा विडा मोशीतील उद्योजक गणेश कुदळे यांनी घेतला. या विड्यातून महाराजांचा आशीर्वाद मिळाल्याची भावना कुदळे यांनी व्यक्त केली. तसेच, मानाची ओटी वासुदेव आल्हाट व धोंडीबा आल्हाट यांनी १६ लाख ५० हजार रुपये बोली लावून घेतली. मोशीच्या आजपर्यंतच्या इतिहासात मानाच्या विड्यासाठी एवढी मोठी बोली लावल्याने हा इतिहास घडला, असे ग्रामस्थांनी सांगितले. 

साध्या वेषात जॅकी श्रॉफ पोहोचला मावळात; घरकाम करणाऱ्या तरुणीचं केलं सांत्वन

कोरोनाच्या नियमांचे पालन करत दीडशे वर्षांची परंपरा जतन करून येथील भंडारा उत्सव सुरू आहे. शनिवारी (ता. १३) लिलाव होता. स्थानिक ग्रामस्थ महाराजांना सोन्या-चांदीचे दागिने, शेतातील फळे, भाजीपाला यासह विविध वस्तू अर्पण करतात. महाराजांचा मानाचा विडा, ओटी व मानाचे लिंबू आदी वस्तूंचा लिलावास शनिवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. पिढ्यान् पिढ्या लिलावाची बोली लावण्याचे काम नारायण केदारी, सागर केदारी आणि निखिल केदारी यांनी केले. आपल्या खर्जातील आवाजात एक-एक वस्तूंची ते बोली लावत होते. शासकीय नियमानुसार, मोजक्या विश्‍वस्त व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा लिलाव सुरू होता. यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, नितीन सस्ते, हरिभाऊ सस्ते, स्वीकृत नगरसदस्य सागर हिंगणे, प्रभाकर बोराटे, नीलेश बोराटे, अतिश बारणे उपस्थित होते. ‘विड्याच्या रूपाने महाराजांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे’, असे गणेश कुदळे, वासुदेव आल्हाट व धोंडीबा आल्हाट यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

मानाचे लिंबू 
महाराजांना अर्पण केलेल्या मानाच्या वस्तूंपैकी मानाचे पहिले लिंबू ५५ हजार रुपयांना; तर शेवटचे लिंबू ७ लाख ८५ हजार रुपयांना संदीप आल्हाट यांनी घेतले. एकूण लिलाव एक कोटीहून अधिक रुपयांच्या घरात गेल्याचे देवस्थान ट्रस्टकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Passenger bus caught fire : भीषण दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली बस पेटली; लहान मुलं, महिलांसह १५ जणांचा मृत्यू

Thane News: परप्रांतीयांची मुजोरी वाढली! दिवाळीचा स्टॉल लावण्यावरून वाद पेटला, अमराठी महिलांचं मराठी महिलांसोबत नको ते कृत्य

Latest Marathi News Live Update: कल्याण पूर्वेतील पत्रीपूल ते नवीन गोविंदवाडी रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य

Medical Admission Scam : वैद्यकीय प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांना सीईटी सेलची नोटीस

Ex-Army Man Own Funeral : ऐकावं ते नवलंच! बाबानं जिवंतपणीच काढली स्वत:ची अंतयात्रा अन् मग स्मशानात पोहचताच...

SCROLL FOR NEXT