पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेने लढवली शक्कल; मराठी चित्रपटाच्या नावातून 'अशी' केली कोरोना जागृती

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कोरोनामुळे सुरू असलेल्या आणीबाणीसारख्या परिस्थितीत अनेक माध्यमातून जागृती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशातच आता महापालिकेने "माझी जबाबदारी",  "पीसीएमसी सर्व्हिस" हा हॅशटॅग वापरून श्वास, लयभारी,  अशी ही बनवा बनावी,  लंच बॉक्स अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांच्या नावाचा गंमतीशीर वापर करून कोरोनाबाबत सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेच्या "पीसीएमसी स्मार्ट सारथी" अॅपवर या पोस्ट टाकून नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले. या पोस्टला वाचकांची चांगली पसंती मिळत आहे.

डिजिटल प्रणालीमुळे कापडी बॅनर लिहिणारे हात आता कुठे दिसेनासे झाले आहे. मशिनवर पाहिजे ती डिझाइन बनविता येत असल्यामुळे ब्रशने फलक लिहण्याची प्रथा काळाच्या पडद्याआड गेली आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियाच्या माध्यमातून  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांमध्येदेखील कोरोना विषाणूसंदर्भातील भय कमी करून जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे संदेश दिले चित्रातून 
या संदेशामध्ये  #माझीजबाबदारी जो  #social_Distancing चे पालन करेल तो #लयभारी राव!

#PCMCServices
बाहेरगावाहून आल्यावर कोणतीही बनवाबनवी करू नका.
स्वतःला होम क्वारंटाईन करा.

#माझी_जबाबदारी 
#LunchBox खाताना #social_distancing चे पालन करा.

#PCMCServices
श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. असा संदेश देऊन लोकांचे मनोधैर्य वाढविणे आणि ‘कोरोनाला घाबरू नका, मात्र जागरूक राहा’ असे या संदेशातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपुरात एकाच कुटुंबातील ५ जण बेपत्ता, शेवटचं लोकेशन पुणे; १० दिवसांपासून शोध सुरू

Ketan Agrawal Case : पुण्यातील लोहगड केतन अग्रवाल प्रकरणानंतर 'राष्ट्रीय पुरुष आयोग' स्थापन होणार?, राज्यसभेत पडसाद; भाजप खासदारांकडून मागणी

Marathi Live Updates : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने नद्यांची पाणीपातळी वाढली

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

SCROLL FOR NEXT