पिंपरी-चिंचवड

आधी घरगुती कारणावरून वाद, मारहाण; त्यानंतर तरुणीशी अश्लील वर्तन!

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : तिघांना बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना फुगेवाडी येथे घडली. शैलेश एकनाथ हाके (वय 30), रूपेश ऊर्फ जिवा (वय 27), एकनाथ हाके (वय 60) व नीलेश एकनाथ हाके (वय 36, सर्व रा. संजयनगर, फुगेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अठरा वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे. 

बुधवारी (ता. 3) रात्री अकराच्या सुमारास फिर्यादीच्या घराबाहेर फिर्यादी व त्यांचा भाऊ यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. त्यावेळी हातात लोखंडी पाईप, लाकडी दांडके घेऊन त्याठिकाणी गेलेल्या आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या भावाला मारहाण केली. यामध्ये दोघेही जखमी झाले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तर आरोपींपैकी एकाने फिर्यादीच्या बहिणीशी अश्‍लील वर्तन करीत तिला मारहाण केली. त्यानंतर त्याठिकाणी आलेल्या आरोपी नीलेश हाके याने फिर्यादीसह त्याच्या भावाला कानाखाली मारून सर्वांना जिवे मारण्याची धमकी दिली. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेश विसर्जनाला मोठी गर्दी होणार! मुंबईतील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, मेट्रो सेवेतही बदल; वाचा सविस्तर

CSK पाठोपाठ मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने केली नव्या प्रशिक्षकाची घोषणा! RCB चा कोच फोडला, कोण आहे तो?

Nagpur DJ Ban : डीजेच्या मनमानीला आता डीसीपी-एसीपीही जबाबदार; नागपूर खंडपीठाचे पोलिस आयुक्तांना नव्याने अधिसूचनेचे निर्देश

Solapur News: आचारसंहितेचा सोलापूरच्या विकासकामांना ब्रेक; १,४८३ कोटींचा पाणीप्रकल्प, उड्डाणपूल अन् भरती रखडणार

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग आणणार : संजय राऊत

SCROLL FOR NEXT