pcmc sakal
पिंपरी-चिंचवड

पे अँड पार्कविरोधात घंटानाद

महापालिकेसमोर एमआयएमचे आंदोलन; महिलांचाही सहभाग

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पे ॲंड पार्क धोरणाला विरोध, पवना नदीची पूररेषा दर्शविणारे दोन नकाशे तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह बदलणाऱ्यांवर कारवाई करा, आदी मागण्यांसाठी एमआयएमने मंगळवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर घंटानाद आंदोलन केले. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

एमआयएमचे प्रदेश महासचिव अकिल मुजावर, शहाराध्यक्ष धम्मराज साळवे, शफिउल्ला काझी, कुतुबुद्दीन होबळे, महिला शहराध्यक्षा रुहिनाज शेख, इरफान नैसर्गी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. मोईन मुलाणी, अकिफ शेख, फरीन शेख, फरिदा शेख, आशा नवतारे, मैमुना शेख, मोहतसेन सिद्दीकी, अब्दुल रौफ कुरेशी आदी उपस्थित होते. त्यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांची भेट मागण्यांचे निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, कोरोना व लॉकडाउनमुळे नागरिकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पे अँड पार्क धोरण रद्द करावे. पवना नदीचे दोन भिन्न नकाशे तयार केले आहेत. त्या बनावट नकाशाच्या आधारे स्थानिक जागा मालकांनी बिल्डरांना जागा विकल्या. बांधकाम परवानगी घेत टोलेजंग इमारती बांधून नागरिकांना प्लॅट विकून फसवणूक झाली आहे. त्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. जाधववाडी, चिखली परिसरातील नैसर्गिक ओढ्यानाल्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जाधववाडी मातोश्री स्वागत कमानीजवळील नाल्याचा प्रवाह बदलला आहे. त्यामुळे पाणी साचून नागरिकांना त्रास होणार आहे. यात दोषी अभियंते व अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील कोंढवामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तासांत अटक

SCROLL FOR NEXT