पिंपरी-चिंचवड

भारत बंदचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतही पडसाद; सर्वसाधारण सभेत जोरदार घोषणाबाजी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : शेतकरी व कामगार कायद्याच्या विरोधाचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी (ता. 8) पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी शेतकरी व कामगारविरोधी कायदे करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ काळा पोशाख परिधान करून सभागृहात प्रवेश केला. शिवसेनेने देखील केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

शेतकरीविरोधी कायदे करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिल्याने देशभरातील बहुतांश राजकीय, सामाजिक, कामगार संघटनांनी बंदला पाठिंबा दर्शविला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी देखील काळ्या फिती लावून कामावर हजर राहत भारत बंदला पाठिंबा घोषित केला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली काळभोर, प्रज्ञा खानोलकर, नगरसेवक राजू बनसोडे, माजी महापौर मंगला कदम आदी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत महासभेला सुरुवात होण्यापूर्वी सभागृहात प्रवेश केला. त्यामुळे ज्या कारणासाठी भारत बंद घोषित केला, त्या शेतकरी व कामगार कायद्याच्या विरोधाचे पडसाद आज महासभेत देखील उमटल्याचे पहायला मिळाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सभेत विरोधी पक्षनेते मिसाळ म्हणाले, "केंद्र सरकारने केलेले कायदे शेतकरी व कामगारांना मान्य नाहीत. त्यांनी या कायद्याला जाहीरपणे विरोध दर्शविला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज भारत बंदची घोषणा केली आहे. सर्वच क्षेत्रातून भारत बंदला पाठिंबा मिळत असताना, आपण देखील सर्वसाधारण सभा तहकूब ठेवणे योग्य ठरेल. तरी, आजची सभा तहकूब करण्याची मागणी महापौर उषा ढोरे यांच्याकडे केली होती. पण त्यांनी सभा तहकूब न करता सगळे विषय मंजूर केले.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT