Rain_Pune 
पिंपरी-चिंचवड

भोसरी, दिघीमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरवात

संजय बेंडे

भोसरी : भोसरीसह इंद्रायणीनगर, दिघी आदी परिसरात मंगळवारी (ता. ७) दुपारी सव्वाएक वाजल्यापासून जोरदार वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची पळापळ झाली. सुमारे अर्धा तास पडलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणीपाणी झाले.

मंगळवारी (ता. ७) सकाळपासूनच भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी परिसरात ढगाळ वातावरण होते. मात्र, अधूनमधून सूर्याचेही दर्शन होत होते. ढग आणि सूर्य यांचा लपंडावच सुरू होता. दुपारी सव्वाएकच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. सुमारे अर्धातास जोरदार बरसल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. मात्र, त्यानंतरही पावसाचे बरसणे सुरूच होते. जोरदार पावसामुळे भोसरी परिसरात खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची एकच पळापळ झाली. त्याचप्रमाणे रस्त्यावर भाजी विकणाऱ्या विक्रेत्यांचीही त्रेधा तिरपीट उडाली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्याचप्रमाणे भोसरीतील दिघी रस्त्यावरील गंगोत्री पार्क कॅार्नर, पीसीएमटी चौक, भोसरी गावठाणातील मारुती मंदिर, लांडेवाडीतील महिंद्रा सीआयई कंपनीसमोरील रस्ता, पुणे-नाशिक महामार्गावर लांडेवाडीतील ऐतिहासिक प्रवेशद्वार, पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील संत तुकाराम मंगलकार्यालयासमोरील रस्ता, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील रस्ता, शांतिनगर कॅालनी क्रमांक एकसमोरील रस्ता,  इंद्रायणीनगरातील संतनगर बस थांबा, एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरील रस्ता, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलाजवळील रस्ता तर दिघीतील सह्याद्री कॅालनी क्रमांक तीन समोरील रस्ता आदींसह इतर भागातील रस्त्यावर काही वेळ पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे वाहन चालकांना वाहने चालविताना काही वेळ कसरत करावी लागली.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावसाला सुरवात झाल्याबरोबर भोसरीतील भोसरी गावठाण, दिघी रस्ता, चक्रपाणी वसाहत,  पीएमटी चौक परिसर तर इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एक व दोन आणि दिघीतीलही काही भागातील वीजपुरवठा खंडीत झालाले वीजपुरवठा एक तासानंतर सुरळीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

SCROLL FOR NEXT