पिंपरी-चिंचवड

भोसरी बीआरटीएस कर्मचाऱ्यांनी दाखवली माणुसकी; मुलांसह घर सोडलेल्या महिलेला सोपविले नातेवाइंकाकडे 

संजय बेंडे

भोसरी : एक महिला तीन लहान मुलांसह भोसरी बीआरटीएस टर्मिनलमध्ये येते. तिथे बराच वेळ खिन्न चेहऱ्याने घुटमळते. ही घुसमट बीआरटीएसच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या लक्षात येते. विचारपूस केल्यावर असं कळालं, की ती महिला सोलापूरहून पतीच्या त्रासाला कंटाळून कामाच्या शोधात इथे आलीय. कर्मचाऱ्यांनी आपुलकीने त्यांना नाश्‍ता अन्‌ जेवण दिलं. पुढील अनर्थ टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. सुदैवाने, महिलेचा मामा कोथरूडमध्ये असल्याचे कळाले. त्या महिलेला मामांकडे पाठवून बीआरटीएस कर्मचाऱ्यांनी माणुसकी दर्शन घडविले. 

बुधवारी (ता. 23) सकाळी आठ वाजता भोसरीतील बीआरटीएस टर्मिनलमध्ये राधा (बदललेले नाव) या तीन लहान मुलांसह आल्या. मात्र, टर्मिनलवर आल्यावर कोठे जायचे या संभ्रमात त्या तेथेच अश्रू ढाळत बसल्या. ही बाब बीआरटीएस टर्मिनल प्रमुख काळूराम लांडगे यांच्या निदर्शनास आली. लांडगे यांनी त्यांची विचारपूस केल्यावर कळालं, की त्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्‍यातील कुर्डू या गावावरून इथे आल्या. पती त्रास देत असल्याने भोसरी गाठलं. कोणतेही काम करून जगायचं, असं राधा यांनी सांगितलं. त्यांच्यासोबत तीन मुले असल्याचे कळल्यावर लांडगे यांच्यासह सुरेश वडेकर, अंतोबा कोठारे, बाळू नेहरे, सचिन जगताप आदी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नाश्‍त्याची व जेवणाची व्यवस्था केली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राधा यांचे या ठिकाणी नातेवाईक नसल्याने लांडगे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आल्यावर त्यांनी महिलेच्या पतीशी संपर्क साधला. त्याचप्रमाणे त्यांचे मामा कोथरूड येथे राहत असल्याचे कळले. पोलिसांनी मामांशी संपर्क साधला. बीआरटीएसच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बसभाडे देत मामांकडे पाठविले. मामांनी त्यांची समजूत काढून राधा यांना पुन्हा पतीकडे पाठवले, अशी माहिती कॉन्स्टेबल टेक बहादूर गुरुंग यांनी दिली. पोलिसांनीही त्यांच्या पतीशी संपर्क साधून त्रास न देण्याविषयी सज्जड दम दिला. दरम्यान, बीआरटीएस कर्मचाऱ्यांनी वेळीच लक्ष घातल्याने राधा आपल्या तीन मुलांसह मामांकडे पोहोचू शकल्या. याबद्दल बीआरटीएस कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. 

...म्हणून घर सोडले 

राधा यांनी सांगितलं, की पती दारू पिऊन दररोज मारहाण करतो. नवरा बाहेरख्याली असल्यामुळे घर सोडण्याचा निर्णय घेतला. माझी आई भाजीपाला विकून पोट भरते. वडील दारू पितात. भाऊही लहान आहे. त्यामुळे माहेरी कसे जायचे हा प्रश्न होता. म्हणून पुण्याला येऊन काहीतरी कामधंदा करून जीवन जगण्याचा निर्णय घेतला आणि पुण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by Shivnandan Baviskar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT