Bhosari  Sakal
पिंपरी-चिंचवड

Bhosari : मटण कमी पडलंय, बिर्याणी मागवा...आखाड पार्टी, कार्यकर्त्यांबरोबरच हॉटेल व्यावसायिकांना सुगीचे दिवस

गेल्या दोन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुकीमुळे इच्छुक उमेदवारांनी खर्चावर बंधने आणली होती.

रमेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

Bhosari - गेल्या काही महिन्यांपासून काहीशा अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्याला आखाडाच्या निमित्ताने पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. ‘निवडणूक होईल, तेव्हा होईल पण यंदाचा आखाड जोरात झाला पाहिजे’ असं म्हणून अनेक कार्यकर्ते इच्छुकांच्या खनफटीला बसले आहेत.

त्यामुळे इच्छुकांनीही आखाडामुळे हात आखडता न घेता, सैल सोडला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबरच हॉटेल व्यावसायिक, ढाबा चालक, केटरर्स यांच्या दुधात साखर पडली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुकीमुळे इच्छुक उमेदवारांनी खर्चावर बंधने आणली होती. निवडणुका निश्चित झाल्याशिवाय ‘खर्च नको रे बाबा’ ही भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, पुन्हा आखाडाच्या निमित्ताने त्यांना कार्यकर्ते व हितचिंतकाचे फोन खणखणू लागले आहेत. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आपल्या निर्णयात बदल केल्याचे जाणवत आहे.

आखाड पार्ट्यांमुळे परिसरातील मंगल केंद्रे, हॉटेलमधून जेवणावळींना बहर आला आहे. मात्र, एका निरोपामागे चारजण येऊन संख्या वाढत असल्याने नियोजन बिघडत असल्याच्या गमती जमतीही घडत आहेत.

त्यातूनच ‘हॅलो, नेते मटण कमी पडलंय, पंगत बसलीय बिर्याणी मागवा’ असेही निरोप दिले जात आहेत. केटरर्स, हॉटेल व्यावसायिक, चिकन- मटण दुकानदारांना किलोच्या दरावर शंभर शंभर किलोच्या ऑर्डर मिळत आहेत.

मद्याचा महापूर

आखाड पार्टीसोबत मद्यही द्यावे लागत असल्याने इच्छुकांच्या खिशाला झळ सोसावी लागत आहे. ‘नुसतं कोरडं नको, ओलंही पाहिजे.’ असा सूर निघत असल्याने जेवणावळीसाठी मटणासह मद्याची व्यवस्थाही इच्छुकांना करावी लागत आहे. प्रत्यक्ष आखाडपार्टीत ‘तुम्हीच निवडून येणार, त्यासाठी आम्ही जिवाचं रान करणार’ असं आश्‍वासन देऊन कार्यकर्ते इच्छुकांना हरभऱ्याच्या झाडावर बसवत आहेत.

सध्या सगळीकडेच आखाड पार्ट्यांचं वारं सुटलंय. आम्ही कार्यकर्तेही एकमेकांना फोनवर निरोप देऊन रविवारी भेटलो. एरवीही कामाच्या रगाड्यात असलेली मित्रमंडळी अशा ठिकाणी भेटल्यावर एकमेकांना आग्रह करणे, क्रमप्राप्त होते. त्यातून अंदाज चुकल्याने ऐनवेळी पर्यायी व्यवस्थाही करावी लागली.

- एक कार्यकर्ता,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharia law : 'सत्तेत आल्यास देशात शरिया कायदा लागू करणार, हिंदूंसह मुस्लिमांना देणार अधिकार'; फैजुल करीम यांचं वादग्रस्त विधान

Shaktipeeth Highway : सतेज पाटील, राजू शेट्टींचे ‘शक्तिपीठ’विरोधात विठ्ठलाला साकडे

Ashadhi Wari 2025 : पुण्याहून पंढरपूरसाठी ३२५ अतिरिक्त बस, गाड्या शनिवारी, रविवारी धावणार; नियंत्रण कक्ष स्थापन

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

SCROLL FOR NEXT