Bhosari Bhairavnath Mandir
Bhosari Bhairavnath Mandir sakal
पिंपरी-चिंचवड

Bhosari News : शहरीकरणातही भोसरीकर जपतायेत गावपण

सकाळ वृत्तसेवा

वडाच्या पानांचे बारा विडे... त्याला मराठी महिन्यांची नावे... प्रत्येक विडा उघडून घेतला जातो ऋतु आणि वातावरणाचा अंदाज... ग्रामस्थांद्वारे सभेत गावाच्या जत्रेसाठीचाही घेतला जातो निर्णय...

भोसरी - वडाच्या पानांचे बारा विडे... त्याला मराठी महिन्यांची नावे... प्रत्येक विडा उघडून घेतला जातो ऋतु आणि वातावरणाचा अंदाज... ग्रामस्थांद्वारे सभेत गावाच्या जत्रेसाठीचाही घेतला जातो निर्णय... ही परंपरा शेकडो वर्षापासून चालत आल्याचे गावकरी सांगतात... भोसरी गावाने शहरीकरणातही गावाचे गावपण जपत जुनी परंपरा आजपावेतो सुरूच ठेवली आहे.

किती वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे हे गावकऱ्यांना सांगता येत नाही, मात्र ही परंपरा शेकडो वर्षापासून चालत आल्याचे ग्रामस्थ अभिमानाने सांगतात. भोसरी गावठाणातील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात ही सभा याही पाडव्याला घेण्यात आली. या सभेत भोसरी उत्सव समितीचे उत्सवप्रमुख श्यामराव फुगे, माजी नगरसेवक अॅड. नितीन लांडगे, पंडीत गवळी, भानुदास फुगे, बाजीराव लांडे, शेखर लांडगे, किसन शिंदे, विनायक माने, मदन गव्हाणे, बाजीराव लांडगे, बाळासाहेब गव्हाणे, राजाराम महाराज फुगे, अॅड. अमर लांडगे, नितीन लोंढे, मदन गव्हाणे आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

पाडव्याच्या दिवशी सकाळीच वडाच्या पानांमध्ये ज्वारी, बाजरी, साळी आदी धान्य ठेवून त्याला मराठी महिन्यांची बारा नावे दिली जातात. भैरवनाथ मंदिराच्या झालेल्या बैठकीत प्रत्येक विडा उघडून गावात पडणाऱ्या पावसाचा अंदाज गावच्या ब्राह्मणाद्वारे सांगितला जातो. त्याचप्रमाणे याच सभेत हनुमान जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या गावच्या जत्रेचाही निर्णय घेत अगोदरच्या वर्षाच्या जत्रेचा जमाखर्च मांडला जातो आणि जत्रेच्या जबाबदाऱ्याही वाटल्या जातात.

या सभेत ज्येष्ट ग्रामस्थांबरोबरच तरुणांचाही सहभाग बहुसंख्येने असतो. त्यामुळे गावची ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत अशीच जतन होत जपली जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

पाडव्याच्या दिवशी सकाळी विठ्ठल मंदिरात गावच्या विठ्ठल-रुक्मिणी भजीनी मंडळाद्वारे भजन सादर केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

Renuka Shahane : 'मराठी लोकांना कमी लेखणाऱ्यांना मत देऊ नका'; त्या घटनेनंतर रेणुका यांनी व्यक्त केला संताप

मराठा समाजातील NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कुणबी आरक्षण न मिळाल्याने एकाने संपवले जीवन

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

SCROLL FOR NEXT