Maharashtra Politics Esakal
पिंपरी-चिंचवड

Maharashtra Politics: भाजपला धक्का! माजी प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार करणार ठाकरे गटात प्रवेश

आरक्षणाच्या मुद्द्यावरून माजी प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवारांनी दिला राजीनामा; ठाकरे गटात प्रवेश गटात करणार प्रवेश

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. अशातच काही नेत्यांनी देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. आपल्या पदाचा राजीनामा देत नेत्याने पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. वेळकाढूपणा करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, पवार हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (ठाकरे गटात) प्रवेश करणार आहेत.

भाजपचे माजी प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी एकनाथ दादा पवार यांनी प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. पवार यांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा देत भाजपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ पवार हे स्वतःच्या वाढदिवसादिवशी शिवबंधन बांधणार आहेत. नांदेड येथून अनेक कार्यकर्ते जमा झाले असून ते मातोश्रीवर पक्ष प्रवेश करणार आहेत.

एकनाथ पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांचा राजीनामा पाठवला आहे. "आज खूप जड अंत:करणाने मी हा निर्णय घेत आहे. गेली ५० वर्षे ज्या पक्षात काम केले, घडलो त्या भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा देत आहे."

"गेली अनेक वर्षे राज्यातील मराठा बांधव आरक्षण मागत असताना त्यांना हे सरकार आरक्षण देऊ शकत नाही. समाज अत्यंत आशेने या सरकारकडे पाहत असताना देखील केवळ वेळकाढूपणा सुरू आहे. त्या सरकारच्या पक्षात शांत बसून राहण्यापेक्षा मी माझ्या भाजपा प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत असून आजपासून मी पक्षापासून मुक्त होत आहे", असं ते म्हणाले आहेत.

एकनाथ पवार कोण आहेत ?

एकनाथ पवार हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. २०१४ मध्ये त्यांनी भोसरी विधानसभा लढवली होती. या निवडणुकीत ५२ हजार मते पडली. त्यानंतर गेल्या वेळी त्यांनी महापालिकेत सभागृह नेते म्हणून काम पाहिले होते.

गेली अनेक वर्षे ते भाजप पक्षासोबत एकनिष्ठ आहेत. एकवेळा स्वीकृत आणि एकदा जनतेतून निवडून येत दोनवेळा ते नगरसेवक राहिले आहेत. भाजपचे शहराध्यक्षपद पद देखील एकनाथ पवार यांनी भूषवले आहे. पवार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने भोसरीमध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT