पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरातील गार्डन्स पुन्हा बंद होणार; महापालिकेचा मोठा निर्णय

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व उद्याने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी गुरुवारी दिला. गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात संसर्ग वाढू लागला आहे. दिवसाला पाचशेपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून सध्या काही प्रमाणात सुरू असलेली उद्याने पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, यापूर्वी दिलेला रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचार बंदीचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, यातून जीवनावश्यक वस्तू, जसे दूध, भाजीपाला, फळे आदी पुरवठा करणारे व्यक्ती व त्यांची वाहने; वृत्तपत्रांची सेवा व अन्य अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना व त्यावरील कर्मचाऱ्यांना संचारबंदीच्या आदेशात वगळण्यात आले आहे. दरम्यान, दिवाळीनंतर संसर्ग कमी होऊ लागल्यामुळे तत्कालीन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काही प्रमाणात उद्याने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता उद्याने पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पाटील यांनी दिला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ५०% कर्मचारी WFH वर, आठवड्यातून 2 दिवस Virtual Hearing; मोदींच्या आवाहनानंतर मोठा निर्णय

मुलासमोर नो टीव्ही पॉलिसी, आठ वाजता झोपायचं; गश्मीर महाजनीने मुलासाठी बनवलेत कडक नियम, शाळेत डब्बाही...

महाराष्ट्रात AI आणि ग्रीन डेटा सेंटर पार्कला मंजुरी! AI कंप्यूट हब उभारणार; फडणवीस सरकारचा मेगा प्रकल्प

Maharashtra Latest News Live : विदर्भात उष्णतेचा कहर; नागपूरसह चार जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंशांच्या पार

WTC POINT TABLE: ICCची पाकिस्तानवर मोठी कारवाई! बांगलादेशकडून हरले, त्यात नवीन संकट; भारताला आव्हान द्यायला गेले अन् आपटले

SCROLL FOR NEXT