पिंपरी-चिंचवड

निसर्ग चक्रीवादळाचा मावळातील पक्ष्यांना असा बसला फटका!

दक्ष काटकर

टाकवे बुद्रुक : निसर्ग चक्रीवादळाने मावळात घरांची पडझड व पॉलिहाऊसचे मोठे नुकसान झाले. तर तालुक्यातील अनेक गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, वादळाचा फटका आणखी एका घटकाला बसला तो म्हणजे पक्ष्यांना. या वादळात पक्षी बेघर झाले, तर अनेकांचा मृत्यू झाला.

मावळात वादळामुळे शेतातील पत्र्याचे शेड, जनावरांचे गोठे, कडब्याच्या गंजी मोडकळीस आल्याची घटना घडल्या. याबरोबरच ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्यामुळे चक्रीवादळाचा फटका मोठ्या प्रमाणात पक्षांना बसला आहे. मावळात अनेक  ठिकाणी वृक्ष जोरदार वाऱ्याने तुटून पडले, तर काही वृक्षांच्या फांद्या तुटल्या. अनेक मोठी झाडे कोसळली. फांद्यांवर असलेली पक्षांची घरटीही तुटली आणि घरट्यातील पिल्ले जमिनीवर पडून जखमी झाली, तर काही पिलांचा मृत्यू झाला. 

महाराष्ट्रात नोंद असलेल्या पक्षांच्या एकूण ५४० प्रजातींपैकी ५० प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अगोदरच मावळात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पक्षांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यात निसर्ग चक्रीवादळामुळे बरेचशे पक्षी व त्यांची अंडी, पिल्ले उंच वृक्षावरून खाली पडून मृत्यूमुखी पडली आहेत. अनेक ठिकाणी घरटी वाऱ्याच्या वेगाने तुटून खाली पडल्याने शेकडो पक्षी बेघर झाले आहेत. त्यात आता पक्ष्यांची संख्या थोडीच राहिली असताना मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे व वृक्षतोडीमुळे पक्षांची संखेत घट होत चालली आहे. त्यामुळे पक्ष्यांचे संवर्धन करणे खुपच गरजेचे आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ज्याप्रमाणे आम्हास जखमी पक्ष्यांविषयी कॉल येतात. ते पक्षी पकडून आम्ही उपचारासाठी पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेत पाठवतो. ते बरे झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या अधिवासात मुक्त करतो. बुधवारी झालेल्या चक्रीवादळामुळे खुपच पक्षी मृत्यूमुखी झाले पण जे जखमी स्वरूपात भेटले त्यांच्यावर आम्ही उपचार करत आहोत.

- सुनील गायकवाड, शिवदुर्ग ऍनिमल रेस्क्यू, लोणावळा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT