PCMC 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदासाठी भाजप, राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदासाठी भाजपच्या हिराबाई उर्फ नानी घुले  यांनी तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांनी उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. मंगळवारी, 23 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता महापालिका भवनातील चव्हाण सभागृहात  निवडणूक होणार आहे. त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. दरम्यान, महापालिकेतील संख्या बळानुसार घुले यांची निवड निश्चित मानली जात आहे. केशव घोळवे यांनी अवघ्या चार महिन्यात राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी शुक्रवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. सत्ताधारी भाजपकडून  हिराबाई घुले यांनी नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेविका सीमा सावळे, शर्मिला बाबर, नगरसेवक सागर गवळी, सुरेश भोईर आदी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिघी- बोपखेल प्रभाग क्रमांक चारचे प्रतिनिधित्व हिराबाई घुले करीत आहेत. गेल्या चार वर्षात त्यांना एकही पद मिळाले नव्हते. यावेळी भाजपने त्यांना उपमहापौरपदी संधी दिली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक अजित गव्हाणे, प्रवीण भालेकर, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, सुलक्षणा धर आदी उपस्थित होते. भालेकर हे तळवडे प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

23 मार्च रोजी होणार प निवडणूक
निवडणुकीसाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मंगळवारी (ता. 23) रोजी सकाळी अकरा वाजता विशेष सभा होणार आहे. पुणे  महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT