Crime 
पिंपरी-चिंचवड

भाजप नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा दाखल; जुगार खेळताना अटक

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - एका घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर वाकड पोलिसांनी छापा टाकला. यात पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीचा देखील समावेश आहे. या नगरसेविका शिक्षण समितीच्या सभापती देखील आहेत. ही कारवाई थेरगाव येथील पडवळनगर येथे करण्यात आली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुरली ईश्वरदास येलवाणी (वय ६५, रा. काळेवाडी), विनोद यशवंत मिरगणे (वय ३८, रा. थेरगाव), शहाजी मधुकर पाटील (वय ४८, रा. वाकड), समीर अकबर अत्तार (वय ३६, रा. थेरगाव), प्रमोद प्रकाश पवार (रा. पडवळनगर, थेरगाव), बाळू जानराव (वय ३५, रा. वाल्हेकरवाडी), विनोद जाधव (वय ३०), राजस्थानी मारवाडी (पूर्ण नाव माहिती नाही, रा. पडवळनगर, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

प्रमोद पवार हा भाजप नगरसेविका मनीषा पवार यांचा पती असून मनीषा पवार या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती आहेत. पडवळनगर येथे एका व्यक्तीच्या घरी जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता तेथे बेकायदेशीरपणे रम्मी नावाचा जुगार सुरु असल्याचे आढळून आले. 

तसेच मास्क न वापरता एकत्र जमून कोरोना संसर्ग पसरविण्याचा धोका निर्माण केला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT