BJP government NCPs proposal general body meeting No decision from the mayor.jpg
BJP government NCPs proposal general body meeting No decision from the mayor.jpg 
पिंपरी-चिंचवड

राज्य सरकारचं अभिनंदन भाजपनं टाळलं; राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला केराची टोपली

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : मोरवाडी चौक (पिंपरी) ते निगडी पर्यंतच्या मेट्रोला दिलेली मान्यता आणि    लोकहिताच्या योजना, नवीन घर घेताना घराची नोंदणी महिलेच्या नावाने केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय अंदाजपत्रकात घेतल्याबद्दल महाविकास आघाडी राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत मांडला. मात्र, त्यावर सत्ताधारी भाजपने कोणताही निर्णय घेतला नाही. राज्य सरकारचे अभिनंदन करणे टाळले. या अभिनंदन ठरावाला माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी विरोध केला. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा मंगळवारी आयोजित केली आहे. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. सुरुवातीला विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. कारण, पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिकेस राज्य मंत्रिमंडळाच्या 10 फेब्रुवारीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी 946 कोटी 73  लाख एवढा खर्च येणार आहे.  या मार्गिकेची लांबी 4.41 किलो मीटर इतकी असून यात 3 स्थानके आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने मेट्रोला मान्यता मिळाली. तसेच, राज्याचा अर्थसंकल्पात लोकहिताच्या योजना जाहीर केल्या आहेत.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरोग्य सुविधेत सुधारणा करण्यासाठी महापालिकेकरिता भरीव तरतूद केली आहे. राजमाता जिजाऊ गृह स्वामिनी योजना त्यांनी जाहीर केली आहे. एक एप्रिलपासून नवीन घर घेताना घराची नोंदणी महिलेच्या नावाने केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्के सवलत देऊन येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

राज्य सरकारने महिलांचा सन्मान केला आहे. त्यानिमित्त राज्य सरकारचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी मांडला. त्याला विरोध करताना माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ''सव्वा वर्षांपासून राज्य सरकार जनतेचे सरकार आहे की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. एखादी गोष्ट केली की अभिनंदनाचा प्रस्ताव आणून आपली टिमकी वाजवून घेतात. राज्यात आघाडी नव्हे बिघाडी सरकार आहे.'' यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक आक्षेप घेऊ लागले. त्यावर महापौर ढोरे यांनी पवार यांना खाली बसण्याची सूचना केली. त्यानंतर महापौरांनी अभिनंदन ठरावावर कोणताही निर्णय न घेता पुढील कामकाज सुरू केले

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT