Raju-Misal
Raju-Misal 
पिंपरी-चिंचवड

भाजपकडून गलिच्छ राजकारण : राष्ट्रवादी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - राज्यातील महाविकास आघाडी सरकारतर्फे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंदाजपत्रक मांडले. त्यात शहर परिसरासाठी काही महत्त्वाच्या योजना आहेत. त्यामुळे महापालिका सर्वसाधारण सभेत राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव आम्ही मांडला होता. परंतु, सत्ताधारी भाजपने त्याला विरोध दर्शविला. ठराव मंजूर केला नाही. हा कोतेपणा असून, भाजपचे गलिच्छ राजकारण आहे, असा आरोप महापालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहराच्या दृष्टीने पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या कामास मान्यता, पुण्याबाहेरून अंदाजे २६ हजार कोटी रुपयांचा १७० किलोमीटर लांबीच्या चक्राकार मार्गाची (रिंगरोड) उभारणी, पिंपरी ते भक्ती-शक्ती मेट्रो प्रकल्पास मान्यता व अंदाजपत्रात भरीव तरतूद इत्यादी कोट्यवधींची तरतूद राज्य सरकारने केली आहे. यासह कोरोना संसर्गांच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील दर्जेदार आरोग्य सुविधेसाठी पाच वर्षांत पाच हजार कोटींची भरीव तरतूद केली आहे. त्यापैकी या वर्षासाठी ८०० कोटी रुपये देणार आहेत. प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पोस्ट कोविड काऊन्सिलींग व ट्रिटमेंट सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. या सर्व लोकहिताच्या योजना मांडल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता. परंतु, सत्ताधारी भाजपच्या प्रतिनिधींनी त्याला विरोध दर्शवून राजकीय अपरीपक्वता दाखवून दिली आहे, असे मिसाळ यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT