पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्ताचा नुसताच गाजावाजा; प्रत्यक्षात मात्र...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : लॉकडाउनची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. मात्र, काही नाकबंदीच्या ठिकाणी केवळ एक, दोन बॅरिकेड शिवाय पोलिस कर्मचारीही नजरेस पडत नसल्याने वाहने बिनधास्तपणे ये-जा करीत होते. ना कसली तपासणी, ना चौकशी त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या काही भागात नाकाबंदी केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून आली. 

कडक लॉकडाउन असल्याने शहरात नाकाबंदीसह कडेकोट बंदोबस्त तैनात असणार असल्याचा सोमवारी मोठा गाजावाजा करीत पोलिसांकडून सांगण्यात येत होते. शहरात प्रवेश करणाऱ्या ठिकाणांसह अंतर्गत भागात 66 ठिकाणी नाकाबंदी असल्याचे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात मंगळवारी अनेक ठिकाणी नाकाबंदी सैल असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी केवळ बॅरिकेड उभारले होते. मात्र, पोलिसांचा पत्ताच नव्हता. तळवडे येथून शहरात प्रवेश होतो. मात्र, याठिकाणच्या तळवडे चौकात केवळ दोन बॅरिकेड उभारल्याचे मंगळवारी दुपारी दिसून आले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बिनधास्तपणे वाहने ये-जा करीत होती. अशीच परिस्थिती ज्योतिबानगर येथील चेकपोस्ट, चिंचवड स्टेशन चौक, चऱ्होली फाटा आदी ठिकाणी पहायला मिळाली. त्यामुळे भागात वाहनचालकांसह पादचाऱ्यांचीही गर्दी पहायला मिळाली. बिनधास्तपणे नागरिक वावरत होते. तर काही भागात नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची काटेकोरपणे तपासणी केली जात होती. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भोसरी एमआयडीसीतील यशवंतनगर चौक, भोसरीतील पीएमटी चौक, श्री तिरूपती बालाजी चौक, दिघीतील बोपखेल फाटा, देहूफाटा, टेल्को रोड, मामुर्डीतील मुकाई चौक, दापोडी आदी ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात होती. 

नागरिकांनी घेतला अंदाज 

सकाळपासून दुपारपर्यंत नागरिकांनी परिस्थितीचा अंदाज घेतला. यापूर्वीच्या लॉकडाउनवेळी पोलिस बंदोबस्त असलेल्या ठिकाणची माहिती घेतली. तसेच, सध्या त्याठिकाणी पोलिस नसल्याचे समजल्यानंतर नागरिकही घराबाहेर पडू लागले. त्यामुळे काही परिसरात दुपारनंतर वर्दळ वाढल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर करुणा मुंडे यांचा गंभीर आरोप

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

SCROLL FOR NEXT