bomb 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी: क्रोमा मॉलजवळ बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

सकाळ वृत्तसेवा

पिंपरीतील क्रोमा मॉलजवळील मोकळ्या जागेत सोमवारी दुपारी बॉम्बसदृश्य वस्तू आढळली . याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पिंपरी बाजारपेठेजवळच हे ठिकाण आहे

Pimpari Chinchwad पिंपरी- पिंपरीतील क्रोमा मॉलजवळील मोकळ्या जागेत सोमवारी दुपारी बॉम्बसदृश्य वस्तू आढळली . याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पिंपरी बाजारपेठेजवळच हे ठिकाण आहे. या परिसरात नेहमीच गर्दी असते. दरम्यान, दुकाने खुले ठेवण्याबाबतचे निर्बंध कमी केल्याने दुकानांमध्येही गर्दी आहे. अशातच ही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून बाँम्ब शोधक व नाशक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. ही वस्तू ब्रिटिशकालीन बाँम्ब असल्याचे बोलले जात आहे. (Pimpari Chinchwad News)

काही दिवसांपूर्वी चिंचवडगावातील चापेकर चौकजवळही बॉम्बशेल सापडले होते. याबाबत अधिक तपास केला असता ते बॉम्ब शेल निकामी असल्याचे समोर आले होते. तसेच पूर्वी सैन्याच्या सरावादरम्यान काही ठिकाणी जमिनीत अशाप्रकारचे बॉम्ब शेल गाडले गेल्याचेही बोलले जात होते. तर अनेकदा भंगार गोळा करताना अशा प्रकारचे निकामी बॉम्बशेल सापडत असतात अशीही माहिती समोर आली होती. दरम्यान, पिंपरीत सापडलेल्या बॉम्ब सदृश्य वास्तुबाबतचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balumama Temple Admapur land Scam : लाखात घेतली, कोट्यवधींना देवस्थानला विकली; बाळूमामा ट्रस्ट जमिनीत 11 कोटींचा गैरव्यवहार, पाच मध्यस्थींना केली अटक

Ganesh Procession : साउंड सिस्टीमच्या ट्रॅक्टर मालकास; एक वर्ष कारावासासह ३० हजारांचा दंड

Shiv Sena Political Clash : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी 'युद्ध'; दिशा सालियन प्रकरणाला 'गद्दारी'वरून प्रत्‍युत्तर, वादग्रस्त विषयांना पोलिस परवानगीने आश्चर्य

Latest Marathi News Live Update : निटचा निकाल जाहीर

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

SCROLL FOR NEXT