Both have been arrested for allegedly abusing a Coyate at Sant Tukaramnagar in Pimpri 
पिंपरी-चिंचवड

कोयते उगारून शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांना अटक

मंगेश पांडे

पिंपरी : 'पोलिसांना बोलवतो' असे म्हणल्याच्या कारणावरून दोघांनी तरूणाला शिवीगाळ करून कोयते उगारले. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना पिंपरीतील संत तुकारामनगर येथे घडली.
 
रोहन नामदेव जाधव (वय 19, रा. अक्षय सोसायटी, संत तुकारामनगर, पिंपरी), हर्षल शिवाजी साबळे (वय 19, रा. लांडे चौक, कासारवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दिनेश विश्‍वास पाटील (वय 35, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी फिर्यादी आहे. शुक्रवारी (ता.13) फिर्यादी हे आरोपींना टोकल्याचे व पोलिसांना बोलवितो असे म्हणाले होते.

या कारणावरून शनिवारी (ता.14) सकाळी साडेअकराच्या सुमारास आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यांच्या अंगावर धावून जात त्यांच्यावर कोयते उगारले. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT