पिंपरी-चिंचवड

मोबाईलचा चार्जरच्या वादातून गोळीबार, रहाटणीत तरुणाचा मृत्यू

सकाऴ वृत्तसेवा

ही घटना राहाटणी येथे रविवारी (ता.१५) रात्री घडली.

पिंपरी: मोबाईलचा चार्जर घेताना झालेल्या वादातून तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केला. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना राहाटणी येथे रविवारी (ता.१५) रात्री घडली.

सोहेल इनामदार असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर याप्रकरणी किरण वासरे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहाटणीतील शिवराजनगर येथे एक्सपर्ट नावाचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे. येथे आरोपी किरण वासरे रविवारी मोबाईलचा चार्जर आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी किरण व सोहेल यांच्यात वाद झाला.

यामध्ये किरण याने त्याच्याकडील पिस्तुलातून सोहेलच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी सोहेलला लागल्याने गंभीर जखमी झालेल्या सोहेलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी किरण याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीकडे पिस्तूल कुठून आले, घटनेमागे अन्य काही कारण आहे, याबततचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, राज्यपाल रात्री अचानक गेले राज्याबाहेर; काँग्रेससमोर पेच?

Rajat Patidar: आरसीबी फायनलमध्ये! पाटीदारच्या 'त्या' एका निर्णयामुळे गुजरात टायटन्स भुईसपाट; नेमकं काय घडलं?

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT