अनेक जण अनभिज्ञ; श्रमिकांच्या नोंदणीला अडचणी
अनेक जण अनभिज्ञ; श्रमिकांच्या नोंदणीला अडचणी sakal
पिंपरी-चिंचवड

भाऊ! ‘ई-श्रमकार्ड’ म्हणजे काय?

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : केंद्र सरकारने असंघटित कामगारांसाठी ‘ई-श्रम कार्ड’ सुरू केले आहे. त्यासाठी ई-श्रम पोर्टलदेखील बनवले. मात्र, कामगार कार्यालयामध्ये नोंद नसलेल्या कामगारांना पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी अनभिज्ञ आहेत. तसेच आधार नोंदणी केंद्रासारखी सोय नसल्याने अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी बहुसंख्य श्रमिक ई-श्रम कार्डपासून वंचित आहेत.

सध्या केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने कामगार विभागाला ई-श्रम पोर्टलवर श्रमिकांच्या नोंदणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार नागरी सुविधा केंद्रावर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच या नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही पण यातील बहुसंख्य अशिक्षित व अडाणी असल्यामुळे अनेक कामगारांना नोंदणी करण्याविषयी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे आतापर्यंत किती कामगारांची नोंदणी झाली आहे, याची अधिकृत माहिती नाही.

नोंदणीसाठी असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे वय १६ ते ५९ वर्ष या दरम्यानचे कामगार पात्र असून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसलेले कामगार नोंदणी करू शकतात. यात स्थलांतरित, कचरावेचक, शेतमजूर, फळे-भाजीपाला विक्रेते, प्रवासी मजूर, वीटभट्टी मजूर, मच्छीमार, मीठ श्रमिक, टेनरी वर्कर्स, बांधकाम मजूर, चामडे उद्योग मजूर, नाभिक, वृत्तपत्र विक्रेता, रिक्षा चालक, घरकाम करणारे, फेरीवाला, हॉटेल, भंगार, अंगावर काम घेणारे, सुतार, पेंटर, मातीकाम, घरकामगार, ऊसतोड, कुंभारकाम, लॉन्ड्री, चपाती सेंटर कामगार, कापूस पिंजारी अशा शासनाने निश्चित केलेल्या ३०० उद्योगातील हे असंघटित कामगार असणे आवश्यक आहे.

नोंदणीसाठी आधारकार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल नंबर आवश्यक आहे. परंतु या कामगारांना नोंदणी करण्याचे माहीत नसल्यामुळे त्यांची नोंदणी होण्यास अडचणी येत आहेत. याबाबत कामगार कल्याण मंडळालादेखील माहिती नसल्याची माहिती आहे.

संपर्क मोहीम राबवावी

केंद्र सरकारच्या रोजगार विनिमय, रोजगार व स्‍वयंरोजगार कार्यालय किंवा कामगार कार्यालयामार्फत स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था किंवा सक्षम अधिकारी सरकारने नेमलेला नाही. अशा शेकडो कामगारांना ‘ई-श्रम’ कार्ड मिळवून देण्यासाठी महापालिका, ‘एमआयडीसी’, ‘पीएमआरडीए’, तहसील, जिल्हाधिकारी, वॉर्ड अधिकारी यांच्यामार्फत संपर्क मोहीम राबवली पाहिजे. शहरातील विद्यमान कामगार संघटनांच्या कार्यालयातून ही नोंदणी झाली पाहिजे, अशी मागणी असंघटित कामगारांमधून होत आहे.

"ई-श्रम कार्डमध्ये विविध असंघटित कामगार येत आहेत. यासाठी प्रत्येक संघटनांनी आपापल्या सभासदांची नोंदणी करून घेणे आवश्‍यक आहे. कारण योजना त्यांच्यासाठी खूपच लाभदायक आहे." -माधवी शिंदे, अध्यक्षा, बांधकाम सेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'अजितदादांना घेऊन ब्रँड व्हॅल्यू कमी....', RSSमध्ये त्या लेखावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Waqf: वक्फ बोर्डाकडे एवढी संपत्ती आली कुठून? वाट्टेल त्या मालमत्तेवर हक्क सांगता येतो का? इस्लाममध्ये आहेत संदर्भ...

Shakib Al Hasan: कोण, सेहवाग? भारतीय दिग्गजाने केलेल्या टीकेवर शाकिबचं प्रत्युत्तर, वाचा नेमकं काय म्हणाला

Italy Parliament Viral Video : G-7 परिषदेपूर्वी इटलीच्या संसदेत हाणामारी; नेमका प्रकार काय?

Latest Marathi Live Updates : नागपूर स्फोटाच्या घटनास्थळी विजय वडेट्टीवार

SCROLL FOR NEXT