पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये घरफोडीच्या घटना वाढल्या; चिंचवड, दिघीत भरदिवसा चोरी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : चिंचवड व दिघी येथे भरदिवसा घरफोडीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये चोरट्यांनी सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास केला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

चिंचवड येथील घटनेप्रकरणी हनुमान राजेभाऊ सटाले (रा. पांडुरंग निवास, नंदनवन सोसायटी, मातोश्रीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली. शुक्रवारी (ता. 9) फिर्यादी हे घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह गावी गेले होते. त्यादरम्यान, अज्ञात चोरटा कशाच्या तरी सहाय्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरला. बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यातील 78 हजार रुपये किमतीचे सोन्याचे नेकलेस, पदक व तीन हजारांची रोकड, असा एकूण 81 हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना दुपारी बारा ते सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसरी घटना दिघी येथे घडली. याप्रकरणी दीपाली काशिनाथ दिपके (रा. श्रमदीप बिल्डिंग, गुरूदत्त कॉलनी नं. 2, साईपार्क, दिघी) यांनी फिर्याद दिली. शनिवारी (ता. 10) दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. तेव्हा दरवाजाचे कुलूप तोडून चोरटा आत शिरला. एक लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने, 35 हजारांची रोकड, दोन हजारांचे घड्याळ व अकरा हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा एकूण एक लाख 48 हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना सायंकाळी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC च्या गाजावाज्याच्या पलीकडे 'मूक क्रांती'ची जादू! बंगालच्या राजकारणात RSS च्या ‘नि:शब्द रणनीती’ने कसा इतिहास घडवला?

Election Results 2026 : तृणमूलची १५ वर्षांची सत्ता उलथवली, केरलममध्ये डावे सत्ताबाहेर, पाच राज्याच्या निकालानंतर किती राज्यात भाजपाची सत्ता?

Gokul Milk Administrative Committee : आदेश आला! अखेर गोकुळ दूध संघावर प्रशासकीय अधिकारी मंडळाची नियुक्ती, ५ सदस्यीय मंडळाच्या हातात गोकुळचा कारभार

Childhood Diabetes Management: बालमधुमेहावर केंद्राचा मोठा निर्णय; पहिली राष्ट्रीय नियमावली केली जाहीर!

Mumbai News: भविष्याचा विचार करून भरपाई द्या! न्यायालयाचे ‘मॅक्ट’ला आदेश

SCROLL FOR NEXT