remdesivir_bottle 
पिंपरी-चिंचवड

‘रेमडिसिव्हिरची खरेदी करा; अन्यथा महापालिकेस टाळे ठोकू’ 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : ‘रेमडिसिव्हिर’ इंजेक्शनची तातडीची गरज असताना महापालिका प्रशासन अगतिकपणे स्थायी समितीच्या ठराव पास होण्याची वाट पहात आहे. मागील स्थायी समितीच्या बैठकीत टक्केवारीसाठी ‘रेमडिसिव्हिर’ इंजेक्शन खरेदी ठराव स्थगित करण्यात आला. टक्केवारीसाठी अत्यवस्थ रुग्णांच्या जिवाशी खेळणे हे मानवतेला कलंक आहे. आयुक्तांनी स्वतः:च्या अधिकारात ‘रेमडिसिव्हिर’ची खरेदी करावीत. अन्यथा महापालिकेस टाळे ठोकू, असा इशारा देत शहर राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर निदर्शने केली. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक योगेश बहल, वैशाली घोडेकर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, प्रवक्ते फझल शेख, शेखर काटे, कुणाल थोपटे, उपाध्यक्ष प्रसाद कोलते, अकबर मुल्ला, रोहित नखाते, मयूर जाधव आदींनी सहभाग घेतला. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अकराशे इंजेक्शन शिल्लक : ढाके 
शहरातील खासगी औषध दुकानदारांनी रेमडिसिव्हिर इंजेक्शनच्या बाबतीत कृत्रिम तुटवडा निर्माण केलेला आहे. तथापि आजअखेर महापालिकेच्या भांडार विभागामध्ये ९०० रेमडिसिव्हिर शिल्लक आहेत. तसेच तातडीची बाब म्हणून बाहेरून वाढीव २०० इंजेक्शन उपलब्ध केले आहेत. महापालिकेची जबाबदारी लक्षात घेवुन सहा तारखेला साडेसात हजार इंजेक्शन पुरवठा करण्यासाठीचा खरेदी आदेश संबंधित पुरवठादारास दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयामध्ये रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा कुठेही तुटवडा निर्माण झालेला नाही, असे भाजप सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी म्हटले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: रवींद्र जडेजाचा 'तो' फोटो, साक्षीची Video शूटींग अन् MS Dhoni फक्त रडायचाच बाकी होता, Viral Moment

MBA: नफा आणि निसर्ग दोन्ही महत्त्वाचे! MBA मध्ये 'कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी' आणि 'ग्रीन फायनान्स' या नव्या विषयांना मोठी मागणी

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण: आज 3.30 वाजता महत्त्वाची सुनावणी

Radhanagari Dam : राधानगरी धरण सेवाद्वार नूतनीकरणासाठी ८८ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता

Bilimora Waghai Railway: १०० वर्षांची ‘मिनी ट्रेन’ आजही धावते; बिलीमोरा-वाघई रेल्वे आदिवासींची जीवनवाहिनी

SCROLL FOR NEXT