पिंपरी-चिंचवड

नागरिकांच्या श्रमातून उभी राहिली उद्योगनगरी; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वर्धापनदिन साधेपणाने साजरा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी करण्यासाठी शहरातील नागरिकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शहराला देशातील सर्वोत्तम वैभवशाली शहर बनवण्यासाठी आपण सर्वांनी अशीच एकजुटीने साथ द्यावी, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले. महापालिका स्थापनेच्या 38 व्या वर्धापन दिनानिमित्त शहराचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महापौरांनी शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचा वर्धापनदिन रविवारी (ता. 11) साधेपणाने साजरा करण्यात आला. 

पिंपरी-चिंचवड शहराला उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. इथला कष्टकरी कामगार हा या शहराचा कणा आहे, असे नमूद करून महापौर ढोरे म्हणाल्या, "शहराच्या विकासासाठी आपले समर्पण देणाऱ्या प्रत्येकाच्या त्यागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कामगारांनी आणि कष्टकऱ्यांनी या भूमिला आपल्या घामाने फुलवून शहराला वैभव प्राप्त करून दिले. इथल्या उद्योगधंद्यांनी शहराच्या विकासात भर घातली. शहरातील कष्टकरी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, व्यापारी, उद्योजक, खेळाडू, डॉक्‍टर, अभियंता, संशोधक, कलावंत, साहित्यिक, माध्यम प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी अशा सर्वांच्या त्यागातून, परिश्रमातून, योगदानातून आजची नगरी घडली आहे.'' 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वाढत्या लोकसंख्येचा विचार करून अल्पावधीत विकासाचे विविध टप्पे पार करणाऱ्या शहराने विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. उत्तम पायाभूत सुविधा, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बलांसाठी, तसेच शहर झोपडपट्टी विरहित व्हावे यासाठी परवडण्यायोग्य घरे, मेट्रो प्रकल्प, प्रशासकीय कामात ऑनलाइन पद्धतीचा वापर, दळणवळणासाठी रस्ते, पूल, क्रीडांगणे, उद्याने, विविध योजना महापालिकेच्या माध्यमातून निरंतर राबविल्या जात आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवित असून, नागरिक देखील आपल्या परीने योगदान देत आहेत. कोरोना साथीचे संकट दूर करण्यासाठी आपले सांघिक प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही महापौरांनी सांगितले. 

स्थायी समिती सभापती लोंढे म्हणाले, "शहराच्या जडणघडणीमध्ये प्रत्येकाचा वाटा असून, कुटुंबाप्रमाणे राहून कामकाजाचा गाडा आपण पुढे नेत आहोत. नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोना महामारीतून आपण लवकरच बाहेर पडू.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, 'अ' प्रभाग समिती सभापती शर्मिला बाबर, 'ब' प्रभाग समिती सभापती सुरेश भोईर, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, पदाधिकारी योगेश रसाळ, गोरख भालेकर, बाळासाहेब कापसे, योगेश वंजारी, अमित जाधव, शुभांगी चव्हाण, सुप्रिया सुरगुडे, धनाजी नखाते, रणजित भोसले, अविनाश तिकोणे, मंगेश कोंढाळकर, तुकाराम गायकवाड, कविता सातपुते, सामाजिक कार्यकर्ते गुलाब पानपाटील, संभाजी बारणे, उमेश गवळी, तुषार काळभोर, निलेश घुले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT