पिंपरी-चिंचवड

वडगाव मावळच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाघमारे 

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ (पुणे) : वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक चंद्रजित दिनकर वाघमारे यांची मंगळवारी (ता. 11) बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्‍यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नगरपंचायतीच्या यापूर्वीच्या उपनगराध्यक्षा माया चव्हाण यांनी पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे नुकताच पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी पीठासन अधिकारी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया झाली. उपनगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीकडून चंद्रजित वाघमारे यांनी, तर भाजपच्या वतीने दिलीप म्हाळसकर यांनी अर्ज दाखल केला होता. निर्धारित वेळेत म्हाळसकर यांनी माघार घेतल्याने उपनगराध्यक्षपदी वाघमारे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा ढोरे यांनी केली. 

यावेळी मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, गटनेते राजेंद्र कुडे, दिनेश ढोरे, प्रमिला बाफना, नगरसेवक प्रवीण चव्हाण, राहुल ढोरे, किरण म्हाळसकर, माया चव्हाण, अर्चना म्हाळसकर, सुनील ढोरे, शामराव ढोरे, दशरथ केंगले, पूजा वहिले, पूनम जाधव, सायली म्हाळसकर, शारदा ढोरे, सुनीता भिलारे, दीपाली मोरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. निवडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, माजी उपसभापती गणेश ढोरे, भाजपचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, सुभाष जाधव, तुकाराम ढोरे, पंढरीनाथ ढोरे, गंगाराम ढोरे, चंद्रकांत ढोरे, सुनील ढोरे, विशाल वहिले, सुदाम कदम, अंकुश आंबेकर, प्रवीण ढोरे, राजेश बाफना, बाळासाहेब गायकवाड, प्रकाश गायकवाड, अफताब सय्यद, अतुल राऊत आदींच्या उपस्थितीत वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहराच्या विकासासाठी व सहकार्यासाठी भाजपने दिलीप म्हाळसकर यांचा अर्ज मागे घेतल्याचे भास्करराव म्हाळसकर यांनी सांगितले. पक्षभेद विसरून सर्व नगरसेवक शहराचा सर्वांगीण विकास करतील, असा विश्‍वास बबनराव भेगडे यांनी व्यक्त केला. प्रामाणिकपणे व निष्ठेने पक्षकार्य केल्याचे हे फळ असल्याची प्रतिक्रिया वाघमारे यांनी व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

किल्लारीचा प्रवास: १९९३च्या महाभूकंपातून भेगाळलेल्या जमिनीवर उभी राहिली भविष्याची स्वप्ने

SCROLL FOR NEXT