Politics, Chandrakant Patil esakal
पिंपरी-चिंचवड

Politics: महेश लांडगेंच्या मागणीवर चंद्रकांत पाटलांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, मुंबईचा समु्द्र...

रुपेश नामदास

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज पिंपरी चिंचवड शहरात होते. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. दरम्यान आमदार महेश लांडगे यांनी शहराच्या विकासाबाबत काही मागण्या पाटील यांच्याकडे केल्या,तसेच पुणे जिल्ह्याचे विभाजन व्हावे अशी इच्छा लांडगे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या समोर व्यक्त केली. Latest Marathi News

त्यावर पाटील यांनी महेश लांडगेंच्या इच्छेवर मिश्कील भाषेत सुनावलं ते म्हणाले की, "मला महेश लांडगे यांचं भाषण ऐकताना वाटलं, ते वेगवेगळ्या मागणी करताना मुंबईचा समुद्रही पिंपरीला द्या,अ शी मागणी करतात की काय? परंतु लोकप्रतिनिधी तोच जे समाधानी नसतो.

लोकप्रतिनिधी जेव्हा समाधानी होतो, तेव्हा विकास संपतो. पिंपरी चिंचवडचा वाढणार विस्तार पाहता, कुठलीही गोष्ट पूर्ण होणारी नाही. मी पालकमंत्री म्हणून सर्वांना शब्द देतो की, जे जे विषय येतील, ते पूर्ण करूच, परवाच काही प्रकल्पग्रस्तांनी शहराचं पाणी थांबवलं होतं, त्याबाबतीत त्यांना मी आश्वस्त केलं. Latest Marathi News

वाढत्या शहरामध्ये जशी सरकारची विकासाची जबाबदारी आहे. पाणी, कचऱ्याचं व्यवस्थापन, रस्ते, सुरक्षा याबाबत प्रशासनाची जशी जबाबदारी आहे,तशी ती नागरिकांची ही जबाबदारी आहे," असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT