Charholi Home Project Sakal
पिंपरी-चिंचवड

Charholi Home Project : विकासाकडे वाटचाल करणारी चऱ्होली; घर घेणाऱ्यांची भावना

घराचा शोध घेत असताना चऱ्होलीत आलो. परिसर व बांधकाम आवडले. आणि पन्नास हजार रुपये भरून घर बुक केले.

सकाळ वृत्तसेवा

घराचा शोध घेत असताना चऱ्होलीत आलो. परिसर व बांधकाम आवडले. आणि पन्नास हजार रुपये भरून घर बुक केले.

पिंपरी - मला आई-वडील नाहीत. आजोबा व मामांनी सांभाळ केला. शिक्षण केले. चांगली नोकरी लागली. पुण्यात आलो. पण, स्वतःचे घर हवे होते. अनेक भागात शोधले. मनासारखे व बजेटमध्ये बसणारे घर मिळत नव्हते. बावधन भागात एक फ्लॅट बुक केला होता. पण, त्या व्यवहारात फसलो. एक लाखावर पाणी सोडावे लागले. घराचा शोध घेत असताना चऱ्होलीत आलो. परिसर व बांधकाम आवडले. आणि पन्नास हजार रुपये भरून घर बुक केले.

नव्वद टक्के गृहकर्ज मंजूर झालेय. या भागातील रस्ते, सोयीसुविधा सारे काही नियोजनबद्ध वाटतेय. थोडी शेती थोड्या इमारती पाहून विकासाकडे गावाची वाटचाल सुरू असलेली दिसतेय, खासगी कंपनीत नोकरीस असलेला नरेंद्रकुमार सांगत होता.

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीचे उपनगर अशी चऱ्होलीची ओळख आहे. गावाच्या बारा वाड्यावस्त्या आहेत. एका बाजूला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे सानिध्य लाभलेले तीर्थक्षेत्र आळंदी आहे. शेजारून वाहणारी इंद्रायणी नदी आहे. सुपीक जमीन आहे. परिसरात छोट्या-मोठ्या टेकड्या आहेत. गावठाण व वाड्यावस्त्यांच्या परिसरात मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. बऱ्याचशा प्रकल्पांचे काम सुरू आहे.

वैशिष्ट्ये...

  • प्रशस्त रस्त्यांमुळे कनेक्टिव्हिटी वाढली

  • तीर्थक्षेत्र आळंदी व इंद्रायणी नदीचे सानिध्य

  • आळंदी-पुणे सहा पदरीकरण प्रशस्त पालखी मार्ग

  • छोट्याछोट्या रस्त्यांमुळे वाड्यावस्त्या जोडलेल्या

  • वाघेश्वर मंदिर टेकडीवर शिवसृष्टी व उद्यान

नवीन रस्ते

  • आळंदी-पुणे पालखी मार्गावरील चऱ्होली फाटा ते गाव

  • बालाजी मंदिर ते काळजेवाडी-ताजणे मळा मार्गे गाव

  • वडमुखवाडी ते काळजेवाडी नवीन रस्ता

  • पठारे वस्ती मार्गे लोहगाव

  • दाभाडे वस्ती ते मरकळ रस्ता जोडणारा लिंक रोड

अधोरेखित

  • गावठाणासह वडमुखवाडी, चोविसावाडीची स्वतंत्र ओळख

  • ऐतिहासिक गाव, दगडी दरवाजा आजही अस्तित्वात

  • शैक्षणिक सुविधा, सुरक्षिततेसाठी पोलिस ठाणे

  • वैद्यकीय सुविधा, खासगी रुग्णालये, हॉटेल्स, जलतरण तलाव

  • चांगले बांधकाम व बजेटमधील घरांची उपलब्धता

गतवर्षीचे बांधकाम परवाने...

गाव परवाने

चऱ्होली - ९७

चोविसावाडी - ६९

वडमुखवाडी - ६६

एकूण - २३२

चऱ्होलीगाव नव्याने विकसित होत आहे. सर्व पायाभूत सुविधा इथे उपलब्ध आहेत. विकास आराखड्यानुसार नियोजनबद्ध पद्धतीने विकास होत आहे. सर्व शेती क्षेत्रातील जमिनी असल्यामुळे विकासाला चालना मिळाली आहे. चऱ्होली परिसरात जाण्या-येण्याची साधने अनेक असल्याने घरांना मागणी आहे.

- दादा जाधव, संचालक, अमरनाथ ग्रुप ऑफ कंपनीज्

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात जास्त डेव्हलपमेंट चऱ्होली परिसरात होत आहे. या गावाचे क्षेत्र सर्वात मोठे आहे. जवळपास सात हजार एकरचा हा परिसर आहे. पायाभूत व मूलभूत सुविधा आहेत. कनेक्टिव्हिटी वाढली आहे. त्यामुळे घरांना मागणी वाढली आहे.

- राजेश मेहता, संचालक, तनिष असोसिएटस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission: बिहारमधील गोंधळानंतर आता निवडणूक आयोगाने ‘SIR’बाबत घेतला मोठा निर्णय!

IND vs ENG 4th Test: इंग्लंडचे 'Root' भक्कम! जो रूटची १५० धावांची खेळी, अनेक विक्रम अन् भारताविरुद्ध मोठी आघाडी

Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Shashikant Shinde : सध्याचे सरकार हे राज्याची तिजोरी रिकामी करून आलेले सरकार; महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे दिले आदेश

Narayangaon Crime : लूटमार करणाऱ्या तीन गावगुंडांवर गुन्हा दाखल; दोन आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT