Crime 
पिंपरी-चिंचवड

पत्नीचा आजार व मुलाच्या लग्नासाठी सात्विक पुजा घालण्यास सांगून केली लाखोंची फसवणूक

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पत्नीचा आजार, मुलाचे लग्न व घरातील इतर अडचणी दूर होतील, असे सांगून सहा जणांनी मिळून एकाला सात्विक पुजा घालण्यास सांगत साडेसहा लाखांची फसवणूक केली. हा प्रकार रावेत येथे घडला. याप्रकरणी महाराष्ट्र नरबळी, अमानुष अघोरी प्रथा व जादुटोणा अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विनेश भिकू पाटणे (वय ५०, रा. रोहा, रायगड), शुभांगी सुरेंद्र मगरे (वय ४०, रा. नाहून), सुनील महादेव घारे (वय ६०, रा. लोणावळा), सुरेंद्र मगरे (रा. नाहूर), राजश्री चाफे (वय ४५, रा. कल्याण), विनोद पांड्या (वय ५५, रा. मुलूड), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अर्जुन हनुमंत कालेकर (वय ६४, रा. सिल्व्हर पाम ग्रोव्ह सोसायटी, रावेत) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या पत्नीला आजारातून लवकर बरे करू, असे आरोपींनी त्यांना सांगितले. त्यासाठी ९८ हजार रुपये धनादेशाद्वारे तसेच २ लाख २ हजार रुपयांची रोकड वेगवेगळ्या तारखेला घेतली.

तुमच्या पत्नीचा आजार, मुलाचे लग्न व घरातील इतर अडचणी दूर होतील. त्यासाठी रत्ने व पैडल करून त्याची सात्विक पद्धतीने पूजा करून देतो, असे सांगून आरोपींनी फिर्यादी कालेकर यांचा विश्वास संपादन केला. पैडल व रत्ने यासाठी साडेतीन लाख रुपये रोख घेतले. मात्र, त्याचा कोणताही परिणाम न जाणवल्याने फिर्यादी यांनी पैसे परत मागण्यासाठी आरोपींशी संपर्क साधून विचारणा केली. मात्र, आरोपींनी टाळाटाळ करून त्यांची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केली. फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जावरून गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT