ज्येष्ठाची पावणे दोन कोटींची फसवणूक  sakal
पिंपरी-चिंचवड

पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगले उत्पन्न मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठाची फसवणूक

ज्येष्ठाची पावणे दोन कोटींची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगले उत्पन्न मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर इन्कम टॅक्स, पोलिस अधिकारी असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी ८५ लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी आप्पासाहेब पांडुरंग मिठारी (रा. पाचपीर चौक, कोकणेनगर, काळेवाडी ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनीष मेहता, संजय कुलकर्णी, गणेश ठाकूर, पियुष, अनिकेत, विलास शाखापुरे, नरेंद्र प्रसाद यादव, सतीश पाटील, संतोष रायकर, राहुल सावंत, प्राची मॅडम, श्रुती अग्रवाल, हरीश रेड्डी, सदाशिव रामचंद्र पाटील (रा. घाटकोपर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपींनी ऍगॉन रिलीगिअर लाइफ इन्शुरन्स, रिलायन्स लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या पॉलिसी घेण्यासाठी तगादा लावला. तसेच त्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला इन्कम मिळवून देतो, असे आमिष फिर्यादी यांना दाखविले. त्यानंतर फिर्यादी यांच्या खात्यावरील रक्कम जास्त असल्याची सांगून इन्कमटॅक्स डिपार्टमेंट, आयआरडीए ब्रांच मॅनेजर, क्राईम ब्रांच पोलिस अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादीला भीती घातली.

तसेच वेगवेगळी कारणे सांगून, खोटी कागदपत्रे बनवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन करून फिर्यादीकडून वेळोवेळी रोख स्वरूपात ३९ लाख ७१ रुपये घेत विविध बँकेच्या खात्यावर व चेकद्वारे एक कोटी ४५ लाख ३४ हजार ६६ रुपये भरण्यास भाग पाडले. अशाप्रकारे आरोपींनी एकूण एक कोटी ८५ लाख ५ हजार ६६ रुपयांची फसवणूक करून, या रकमेचा अपहार केला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT