Rahul-Kalate 
पिंपरी-चिंचवड

Chinchwad By-Eelction: कलाटेंना डावलून काटेंना उमेदवारी दिल्यानं भाजपचा विजय सोपा होणार?

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या इशाऱ्यानंतर पक्षाकडून काटेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं नुकतीच नाना काटे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पण यामुळं अपक्ष राहुल कलाटे यांना डावलण्यात आल्यानं महाविकास आघाडीची डोकेदुखीव वाढणार असल्याचं बोललं जात आहे. कारण जगताप यांच्याविरोधात कलाटे हे तगडा उमेदवार होते. मविआकडून उमेदवारीसाठी ते इच्छुकही होते. पण आता त्यांना डावलल्यानं भाजपसाठी ही निवडणूक सोपी झाल्याची चर्चाही सुरु झाली आहे. (Chinchwad By Election easy for BJP because of NCP candidature of Nana Kate not Rahul Kalate)

कलाटेंना उमेदवारी नाकारल्यानं

राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळं राजकीय फासे बदलणार आहेत. कारण शेवटपर्यंत असं वाटतं होतं की राहुल कलाटे यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर होईल. पण तसं झालं नाही, कारण राष्ट्रवादीतील नगरसेवकांनी अशी भूमिका मांडली होती की, चिंचवडची जागा ही राष्ट्रवादीला मिळणार आहे तर पक्षातीलच सदस्याला इथं तिकीट मिळायला हवं तरचं आम्ही प्रचाराचं काम करु. त्यामुळं राष्ट्रवादीनं नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

पण गेल्या २०१९ निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेले राहुल कलाटे हे भाजपच्याविरोधात लढले होते, तेव्हा त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. कलाटे हे सध्या महाविकास आघाडीसोबत आहेत. त्यामुळं पोटनिवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. चिंचवडची जागा राष्ट्रवादीकडं आल्यानं कलाटेंना राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. कारण कलाटे यांनाच जर राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली असती तर या निवडणुकीत लढत तगडी झाली असती, असं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT