Ambedkar_Kalate 
पिंपरी-चिंचवड

Chinchwad ByElection: मविआची डोकेदुखी वाढली! कलाटेंना वंचितचा पाठिंबा जाहीर

लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या चिंचवडमध्ये सध्या तिरंगी लढत होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Chinchwad ByElection : चिंचवडच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची डोकेदुखी आणखी वाढली आहे. कारण अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळं या निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे. (Chinchwad By Election MVA headache increased Support because of VBA support to Rahul Kalate)

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी कलाटेंच्या पाठिंब्याचं अधिकृत पत्र जाहीर केलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं की, वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकी संदर्भात चर्चा झाली.

कसब्यात पाठिंबा नाही कारण...

कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढत आहे पण काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून अजूनही वंचितकडे पाठिंब्याबाबत विनंती पत्र आलेले नाही. म्हणून कसबा पोटनिवडणूकीत पाठिंब्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. पण चिंचवडमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचितनं पाठिंबा दिला होता.‌ त्यामुळं त्यांना 1 लाख 12 हजार मते मिळाली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे सभागृहाचे नेते आहेत, म्हणून ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी असा आमचा आग्रह होता, परंतु तसे घडले नाही.

राहुल कलाटेंना पाठिंबा जाहीर

भाजपला चिंचवडमध्ये राहुल कलाटेच थांबवू शकतात त्यामुळं वंचितच्या राज्य कार्यकारिणीनं एकमतानं राहुल कलाटे यांना पाठींबा जाहीर केला असून त्यांनाच निवडून आणण्याचं आवाहन चिंचवडमधील मतदारांना वंचित बहुजन आघाडी करत आहे, असं रेखा ठाकूर यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test : एकदिवस आधी रिटायर्ड हर्ट झाला, दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला... पण KL राहुलचं शतक थोडक्यात हुकलं!

Pune Restrictions: महत्त्वाची बातमी! पुण्यात १८ ते ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी; कोणत्या गोष्टींवर असणार बंदी अन् का? जाणून घ्या...

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

Nagpur Police Endlife: नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची साडीने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिस दलात खळबळ, कारणांचा तपास सुरू

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

SCROLL FOR NEXT