ncp sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri chinchwad : माघार घेण्यासाठी कलाटेंशी शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते बोलणार

माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी म्हणून आज गुरुवारी (ता. ९) स्थानिक पातळीवरील नेत्यांनी प्रयत्न केले. परंतु; त्यास यश आले नाही. त्यामुळे कलाटे निवडणूक लढविण्याबाबत आजपर्यंत ठाम होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांना माघार घेण्याबाबत बोलणार आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवणूक येत्या दिनांक २६ फेब्रुवारी रोजी होत आहे. कलाटे यांनी माघार न घेतल्यास प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्‍विनी जगताप, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विठ्ठल उर्फ नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

पक्षाचे निरिक्षक, आमदार सुनील शेळके यांनी कलाटे यांच्याशी अजित पवार यांनी बोलावे, अशी त्यांना विनंती केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी रात्री किंवा उद्या शुक्रवारी (ता. १०) सकाळी कलाटे यांच्याशी माघार घेण्याबाबत बोलणार आहेत,

अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, संजोग वाघेरे यांनी दिली. तर; शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पुणे व पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर उद्या सकाळी १० वाजता कलाटे यांच्याशी शहरात येवून बोलणार आहेत. यावेळी अहिर माघार घेण्यासाठी कलाटे यांची पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबरोबर मोबाईलद्वारे चर्चा घडवून आणू शकतात.

अजित पवार यांनी घेतली आढावा बैठक

अजित पवार यांनी आज गुरुवारी (ता. ९) माजी नगरेसवक मोरेश्‍वर भोंडवे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी प्रचाराबाबत चर्चा केली. तसेच; शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशीही प्रचाराबाबत नियोजन केले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले, उप जिल्हाप्रमुख रोमी संधू, अनंत कोऱ्हाळे, सतोष पवार आदि उपस्थित होते.

राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी म्हणून वरिष्ठ पातळीवरुन चर्चा सुरु आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे व पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमुख सचिन अहिर उद्या शुक्रवारी (ता. १०) सकाळी १० वाजता बोलणार आहेत.

- सचिन भोसले, शहर प्रमुख, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT